प्रा. लोंढे हत्याकांड: गुन्ह्यांत ॲट्रॉसिटीच्या कलमांची वाढ, व्यवहारांच्या माहितीसाठी पोलिसांचा बँकेला पत्रव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 18:37 IST2026-03-20T18:36:02+5:302026-03-20T18:37:17+5:30

मुख्य मारेकरी विशाल राठोड २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत, आकाशची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Prof. Londhe murder case: Increase in atrocity clauses in crimes, police correspondence with bank for information on transactions | प्रा. लोंढे हत्याकांड: गुन्ह्यांत ॲट्रॉसिटीच्या कलमांची वाढ, व्यवहारांच्या माहितीसाठी पोलिसांचा बँकेला पत्रव्यवहार

प्रा. लोंढे हत्याकांड: गुन्ह्यांत ॲट्रॉसिटीच्या कलमांची वाढ, व्यवहारांच्या माहितीसाठी पोलिसांचा बँकेला पत्रव्यवहार

छत्रपती संभाजीनगर : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुबराव लोंढे (६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्येच्या गुन्ह्यात आता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम वाढवण्यात आले आहे. तर मंगळवारी मारेकरी रीलस्टार विशाल विकास राठोड (२४) व त्याचा मेव्हणा आकाश विनोद पवार (३२, दोघे रा. गेवराई तांडा) यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यात न्यायालयाने विशालच्या पोलिस कोठडीत २२ मार्चपर्यंत वाढ केली तर मेव्हणा आकाशची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

६ फेब्रुवारीला बेपत्ता झालेल्या लोंढे मिळून येत नसल्याने कुटुंबाकडून उस्मानपुरा ठाण्यात त्यांच्या बेपत्ताची तक्रार नोंदवली होती. १४ मार्चला सबळ पुराव्यांसह त्यांची हत्या करून गेवराई तांडा परिसरात पुरल्याचे निष्पन्न झाले. १४ मार्चला यात विशाल व आकाशला अटक केली. लोंढे यांचा मृतदेह पुरण्यात मदत करणाऱ्या करण विलास आडे (२२) याला रविवारी अटक केली. मंगळवारी विशाल व आकाशच्या पोलिस कोठडीचा कालावधी संपला. त्यानंतर दोघांना न्यायालयात हजर केले. सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी शासनातर्फे तर के.जी. भोसले यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली.

दोघांचा न्यायालयात पोलिसांवर मारहाणीचा आरोप
दुपारी ४ वाजता पोलिसांनी विशाल, आकाशला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. तेव्हा दोघांनी सुरुवातीलाच पोलिसांनी मारहाण करून कुटुंबाला धमकावल्याचा आरोप केल्याने पोलिसही अचंबित झाले. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली. दोघांची खासगीत प्रश्न करुन प्राथमिक चौकशी केली. यामुळे सुनावणी काही काळ थांबवण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने आकाशच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देऊन पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर करण्याची सूचना केली. तपासणीत आकाशच्या शरीरावर काही जखमा आढळल्याचे न्यायालयासमोर सांगण्यात आले. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

ॲट्रॉसिटीचे कलम, तपास एसीपींकडे
सदर गुन्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम (ॲट्रॉसिटी) वाढवण्यात आले आहे. कायद्यानुसार, ॲट्रॉसिटीचा तपास सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देणे बंधनकारक आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) अशोक राजपूत यांच्याकडे तपास वर्ग करण्याचे आदेश जारी केले.

या मुद्द्यांवर होणार तपास
- प्रा. लोंढे यांच्या मोबाईलचे विशालने काय केले?
- गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल त्याने कोणाकडून घेतले?
- लोंढे यांच्याकडून घेतलेल्या लाखो रुपयांचे विशालने काय केले? त्यासाठी पोलिसांनी बँकेला पत्रव्यवहार केला.
- पैशांव्यतिरिक्त लोंढे यांच्याकडील मौल्यवान वस्तू आरोपींनी घेतल्याचा दाट संशय आहे. त्याबाबत चौकशी होणार.
- हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणखी कोणासोबत लोंढे यांचे आर्थिक व्यवहार होते?

Web Title : प्रोफेसर लोंढे हत्याकांड: अत्याचार आरोप शामिल, बैंक विवरण जांच

Web Summary : प्रोफेसर लोंढे की हत्या के मामले में अत्याचार के आरोप शामिल। आरोपी रिमांड पर; पुलिस वित्तीय लेनदेन, संभावित साथियों और लापता कीमती सामान की जांच कर रही है। पुलिस क्रूरता के आरोप लगे।

Web Title : Professor Londhe Murder: Atrocity Charges Added, Bank Details Probed

Web Summary : Professor Londhe's murder case adds atrocity charges. Accused remanded; police investigate financial transactions, potential accomplices, and missing valuables. Allegations of police brutality surface.