शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी पाणीपुरवठ्याचे चटके सुरू

By admin | Updated: September 6, 2014 00:42 IST

औरंगाबाद : महापालिकेने शहर पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करून पाच दिवस उलटत नाहीत तोच नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.

औरंगाबाद : महापालिकेने शहर पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करून पाच दिवस उलटत नाहीत तोच नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. कंपनी ३ वर्षांपासून शहरात काम करीत असल्याचा दावा मनपाने आजवर केला. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ३ वर्षांत फक्त डाटा संकलन केल्याचे आज सांगितले. शहरातील जलवितरण यंत्रणा कशी हे समजण्यासाठी १ महिन्याचा अवधी कंपनीला हवा आहे. पालिकेचे अधिकारी कंपनीला सहकार्य करीत आहेत. मात्र, लाईनमन अजून कंपनीला सहकार्य करीत नसल्याचे आज समोर आले. गुंठेवारीतील टँकर आणि जनकल्याण म्हणून पाठविण्यात येणारे मोफत टँकर्स ठेकेदाराने बंद केल्यामुळे आगामी काळात पाणी चांगलेच पेटणार आहे. पाण्याचा कॉर्पाेरेट धंदा सुरू झाला असून, सगळे काही हायटेक असल्याचा दावा करीत शहराची पाणीपुरवठा व्यवस्था ताब्यात घेतलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे व्यवसाय प्रमुख गौरीशंकर बासू, व्ही. बी. शिवांगी, वसुली अधिकारी विधान चौधरी यांनी केला. उपमहापौर संजय जोशी यांच्या दालनात सिडको-हडको, उल्कानगरी परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार केली. सर्व भाजपाच्या नगरसेवकांनी कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून समन्वय व संवाद यंत्रणा विकसित करण्यासाठी गरमागरम चर्चा केली. यावेळी गटनेता संजय केणेकर, नगरसेवक बालाजी मुंडे, बबन नरवडे, रामचंद्र नरोट, नितीन चित्ते, नगरसेविका साधना सुरडकर, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता वसंत निकम, आय. बी. ख्वाजा यांची उपस्थिती होती. एन-७ जलकुंभावर मिसारवाडीतील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला. १२ टँकर मनपाने मोफ त सुरू ठेवले होते. ते बंद करण्यात आले. त्यानंतर पैसे भरून जे टँकर सुरू होते तेही बंद झाले. त्यामुळे भारिपचे महेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जलकुंभावर हंडा मोर्चा काढण्यात आला. संदीप कंठे, कल्याण गायकवाड, महेंद्र राऊत, युनूस शेख, शे.मुसा आदींसह शेकडो महिलांची उपस्थिती होती. उल्कानगरी वॉर्डामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जलवाहिनीचे कामही ठप्प पडलेले आहे. उपमहापौरांच्या दालनात वॉर्डातील नागरिकांनी पाण्याची मागणी केली. जवाहर को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि. मध्ये कमी वेळ पाणी येते. लाईनमन येऊन पाहणी करून जातो. वेदांतनगरचे नाव सांगून मनपा अधिकारी सोसायटीला कमी दाबाने पाणी देतात. याप्रकरणी सोसायटीने आयुक्तांना निवेदन दिले आहे.