शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तुराबूल हक दर्गाहच्या विकासाचा आराखडा तयार

By admin | Updated: August 24, 2014 23:22 IST

परभणी : येथील प्रसिद्ध सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गाचा विकास करण्यासाठी राज्यात प्रथमच पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याचा विकास आराखडा औकाफ बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर केला

परभणी : येथील प्रसिद्ध सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गाचा विकास करण्यासाठी राज्यात प्रथमच पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याचा विकास आराखडा औकाफ बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री फौजिया खान यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यमंत्री फौजिया खान म्हणाल्या, धार्मिक स्थळ आणि पर्यटनाच्या बाबतीत नांदेडची ओळख गुरुद्वारा आहे. त्याचप्रमाणे परभणीची ओळख सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गा आहे. गुरुद्वारा विकासाच्या निमित्ताने नांदेड शहराचा विकास झाला असून, असाच विकास सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गाच्या निमित्ताने परभणी शहराचाही होऊ शकतो, हे लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील चार अल्पसंख्यांक बहुल जिल्ह्यापैकी परभणी हा एक जिल्हा होय. त्यातूनच पालकमंत्री असताना फौजिया खान यांनी दर्गा परिसर विकासाची संकल्पना शासनाकडे मांडली. विकासाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी मंत्रालयातील संबंधित अधिकारी, औकाफ विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, मनपाचे अधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या. अनेक अडथळ्यानंतर तज्ज्ञ एजन्सीकडून आराखडा तयार करण्याचे ठरले. या प्रकल्पाची फिजीबिलीटी स्टडी करण्यासाठी मिटकॉन या एजन्सीला आराखडा बनविण्याचे काम देण्यात आले. त्यानुसार आराखडा बनवून बांधा- वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वानुसार प्रकल्प सुरू करण्याचा अहवाल एजन्सीने सादर केला आहे. १२१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, धार्मिक, शैक्षणिक आणि वाणिज्य अशा तीन भागात हा प्रकल्प तयार केला जाणार आहे. धार्मिक अंतर्गत दर्ग्याचा विकास, हज हाऊस, मशिद, निवासस्थाने, प्रदर्शनस्थळे व आवश्यक सुविधा, तात्पुरते दुकाने, घरकुल योजना, कम्युनिटी हॉल, अ‍ॅम्युजमेंट पार्क आदींचा समावेश आहे. तर शैक्षणिक विभागात अद्ययावत शैक्षणिक संकुल, ऊर्दू घर, मुला-मुलींसाठी वसतीगृह, तांत्रिक विद्यालये आदींचा समावेश राहील. या सर्व खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी वाणिज्य विभागामध्ये कंदुरीगृह, स्लॉटर हाऊस, हॉटेल्स, थिएटर्स, व्यापारी गाळे, कल्याणकारी निवासस्थाने पार्र्कींग, रुग्णालय, वस्तू संग्रहालय, बहुउद्देशिय संकूल आदींचा समावेश आहे. २२ आॅगस्ट रोजी वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव फिजिबिलीटी तपासून औकाफ बोर्डासमोर सादर केला आहे. औकाफ बोर्डाच्या मंजुरीनंतर खऱ्या अर्थाने प्रकल्पाला सुरुवात होणार असल्याचे राज्यमंत्री फौजिया खान यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री फौजिया खान यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. त्या म्हणाल्या प्रामाणिक प्रयत्न करुन राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेने अधिक १ हजार कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला आहे. (प्रतिनिधी)