शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यासाठी पायाभूत सुविधांना प्राधान्य

By admin | Updated: October 9, 2014 00:49 IST

औरंगाबाद : औरंगाबादची विविध क्षेत्रांतील प्रगती पाहता शहर झपाट्याने वाढत आहे.

औरंगाबाद : औरंगाबादची विविध क्षेत्रांतील प्रगती पाहता शहर झपाट्याने वाढत आहे. भविष्यातील या महानगराच्या विस्तारात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी योजनाबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून औरंगाबादला अत्याधुनिक महानगर बनविण्याचे आश्वासन आ. राजेंद्र दर्डा यांनी दिले. राजेंद्र दर्डा यांनी नेहमीच शहराच्या सर्वांगीण विकासाचे कार्य केले आहे. भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन त्यांनी आपल्या ‘व्हिजन औरंगाबाद’ या जाहीरनाम्यात शहरातील पायाभूत सुविधांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. राजेंद्र दर्डा यांनी योजनाबद्ध आराखडा तयार केला आहे. त्यानुसार रस्ते, वीज, सार्वजनिक वाहतूकव्यवस्था, रेल्वेमार्ग, पाणी, पासपोर्ट कार्यालय, पार्किंग झोन इत्यादीसह अनेक महत्त्वाच्या मुद्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली. औरंगाबाद शहराने विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. अनेक संधी उपलब्ध झाल्याने औरंगाबादची झपाट्याने वाढ होत आहे. वाढती लोकसंख्या आणि विस्तार यामुळे अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यामध्ये रिंग रोडअभावी अनेक वाहने शहरात घुसतात. परिणामी, जालना रोड किंवा इतर मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यातच सार्वजनिक वाहतूक नियमित नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रेल्वेमार्गांची कमतरता, पाणीटंचाई, विजेचे भारनियमन आदींसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी शहरात आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राजेंद्र दर्डा यांनी विविध भागांत पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. शहरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांमुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. सध्या शहरात आणखी तीन उड्डाणपुलांचे काम सुरू असून शहरातील वाहतूक सुरळीत होणार आहे. घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागाची इमारत, विभागीय क्रीडा संकुल, सिडको नाट्यगृह, आंतरराष्ट्रीय विमानतळ, अशी त्यांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांची अनेक उदाहरणे देता येतील. समांतर जलवाहिनीसाठी केंद्राचा निधी उपलब्ध करून देऊन त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.राजेंद्र दर्डा यांच्या आराखड्यात सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेच्या बळकटीकरणापासून ते पासपोर्ट कार्यालयापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्यांचा समावेश आहे. शहर बस वाहतुकीच्या ताफ्यात १०० नवीन बस दाखल करून देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. औरंगाबाद रेल्वेस्टेशन आधुनिकीकरणाच्या कामानंतर आता मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनही सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कुठल्याही शहराच्या विकासात रेल्वेमार्गांचा विकास अत्यंत महत्त्वाचा असतो. औरंगाबाद- चाळीसगाव रेल्वेमार्गाच्या निर्मितीतून मराठवाडा- खान्देशला जोडण्याचे काम हाती घेणार आहे. यासोबतच पाणी, वीज, वाहतूक यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे व्हिजन औरंगाबादमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.