शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाचे पोस्टमॉर्टेम

By admin | Updated: June 18, 2014 01:35 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

औरंगाबाद : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. ग्रामीण भागात बिघडलेल्या आरोग्य व्यवस्थेचा पाढा वाचत सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कुठे दिवसाच आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून डॉक्टर-कर्मचारी गायब झाल्याचे, तर कुठे बायोमेट्रिक मशीन बंद दाखवून रजिस्टरवरच हजेरी नोंदविली जात असल्याची धक्कादायक बाब सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर प्रशासनाने दोन सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. स्थायी समितीची बैठक जि. प. अध्यक्षा शारदा जारवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अनुपालन वाचन सुरू असताना आरोग्य केंद्रातील कर्मचारी संबंधित गावात राहत नसल्याचा मुद्या उपस्थित झाला. त्यावर दीपकसिंग राजपूत यांनी लाडगाव आणि लोणी खुर्द येथील बायोमेट्रिक मशीन लावल्यानंतर चार दिवसांतच ते बंद पडल्याचे सांगितले. मशीन मुद्दाम बंद पाडून एप्रिलपासून जुन्याच पद्धतीने हजेरी नोंदवून पगार काढल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच रजिस्टरमध्ये कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्याची वेळ एकच असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनीही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले.जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तालुका वाटपाचे आदेश काय गोपनीय काढले होते का, असा खोचक सवालही केला. तालुका आरोग्य अधिकारी यापुढे प्रत्येक बैठकीला हजर राहिले पाहिजेत, असेही बैठकीत सांगण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनी यावेळी अधिकाऱ्यांना बैठकीत नुसते पुतळ्यासारखे उभे राहत जाऊ नका, अशा शब्दांत फटकारले.जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी किती आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक मशीन बंद आहेत, याची माहिती अधिकाऱ्यांना देता आली नाही. मनोहर गवई, रामदास पालोदकर, ज्ञानेश्वर मोटे आदी सदस्यांनीही चर्चेत सहभाग घेतला. अंधारीच्या आरोग्य केंद्राला कुलूपज्ञानेश्वर मोटे यांनी अंधारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय उपस्थित केला. या ठिकाणी नेहमीच कर्मचारी गैरहजर राहतात, अशी तक्रार त्यांनी केली. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी लगेच गावातील ग्रामपंचायत सदस्याला फोन लावून आरोग्य केंद्रावर पाठविले.बैठक सुरू असतानाच संबंधिताने आरोग्य केंद्राला कुलूप असल्याचा निरोप फोनवर दिला. तेव्हा दुपारचे ३ वाजले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनी या केंद्रावरील सर्वांचीच बिनपगारी सुटी टाकण्याचे आदेश दिले. बायोमेट्रिक कशासाठी बसविले, त्यावर नोंद होत नसेल तर पगार काढता कसा, तालुक्यांची तपासणी होत नाही का, अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. यावेळी उपस्थितीत दोन सहजिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तुमच्याकडे कोणकोणते तालुके आहेत, अशी विचारणा केली. या प्रश्नाचे उत्तर संबंधितांना देता आले नाही. सहजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर आणि डॉ. गोविंद चौधरी यांना नोटिसा बजावण्याचे आदेश सीईओ चौधरी यांनी दिले.