शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील नऊ मुख्य रस्त्यांवरील टीडीआरबंदी उठण्याची शक्यता

By admin | Updated: July 30, 2016 01:02 IST

औरंगाबाद : शहरातील प्रमुख नऊ रस्त्यांवर टीडीआर वापरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी गुरुवारी औरंगाबादेतील बांधकाम व्यावसायिक, लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

औरंगाबाद : शहरातील प्रमुख नऊ रस्त्यांवर टीडीआर वापरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी गुरुवारी औरंगाबादेतील बांधकाम व्यावसायिक, लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात महापालिकेला त्वरित अहवाल पाठविण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेणार आहे. शासनाने टीडीआर वापरण्याची मुभा दिल्यास शहरातील मुख्य रस्त्यांवर मेट्रो सिटीसारख्या गगनचुंबी इमारती उभ्या राहतील.महापालिकेने २००७-०८ या आर्थिक वर्षात शहरातील नऊ प्रमुख रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास मालमत्ताधारकांना नकार दिला. महापालिकेच्या या निर्णयामुळे प्रमुख रस्त्यांवर मोठमोठ्या इमारती उभारण्याचा मार्ग बंद झाला आहे. २०१६ मध्ये शासनाने टीडीआरला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन नियमावली वापरणे सुरू केले आहे. औरंगाबाद महापालिका आजही जुन्या नियमांचा आधार देत नागरिकांना टीडीआरपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला. २००७ मधील नियम टी-१० त्यामधील पोटकलम ‘अ’ आणि ‘ए’ झोनमधील ‘एच’मधील तरतुदी वगळण्यात याव्यात. रस्त्यांच्या रुंदीनुसार नवीन धोरण शासनाने निश्चित केले आहे. त्याची अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आ. विनायक मेटे, आ. अतुल सावे, आ. सुभाष झांबड, क्रेडाईचे नितीन बगडिया, सलीम पटेल, संजय केणेकर आदींनी घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामीण विकास व महिला बालकल्याणमंत्री पंकजा पालवे यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याच्या सूचना नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांना दिल्या. यावेळी महापालिकेतील प्रभारी सहायक संचालक नगररचना ए. बी. देशमुख उपस्थित होते. करीर यांनी यासंदर्भात शासनाला सविस्तर अहवाल पाठवावा, असे आदेश दिले.अहवाल पाठविणारगुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील नऊ मुख्य रस्त्यांवरील टीडीआर बंदी उठविण्याबाबत चर्चा झाली. शासनाने महापालिकेला याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही लवकरच मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शासनाला अहवाल देणार आहोत. त्यानंतर शासन अंतिम निर्णय घेईल.-ए. बी. देशमुख, प्रभारी सहायक संचालक, नगररचना, मनपालवकरच आदेश निघेलऔरंगाबाद शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास बंदी आहे. या रस्त्यांवर मोठ्या इमारती उभारणे शक्य होत नव्हते. बांधकाम व्यावसायिक, लोकप्रतिनिधींनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी बंदी उठविण्यास तत्त्वत: मान्यता दिली. लवकरच शासनादेश निघेल.-नितीन बगडिया, बांधकाम व्यावसायिक