शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या योजना धनिकांच्या घशात

By admin | Updated: May 30, 2014 01:01 IST

लालखाँ पठाण , गंगापूर पंचायत समिती स्तरावर दिल्या जाणार्‍या विविध योजनांमधील साहित्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून साहित्य हातात येण्याअगोदरच सौदेबाजी होत आहे.

 लालखाँ पठाण , गंगापूर पंचायत समिती स्तरावर दिल्या जाणार्‍या विविध योजनांमधील साहित्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून साहित्य हातात येण्याअगोदरच सौदेबाजी होत आहे. त्यामुळे गरिबांच्या योजनांना लाभ धनाढ्यांना मिळत आहे. पंचायत समितीमध्ये समाजकल्याण, महिला बालकल्याण, कृषी विभाग आदी विविध योजनांमधून लाभधारकांना या योजनेतील साहित्य वाटप करण्यात येते. यात शेती अवजारे, शिलाई मशीन, सायकल, पत्रे, खते, पाईपलाईन, छोटे ट्रॅक्टर मागासवर्गीय व अंपगासाठी कॉम्प्युटर, लॅपटॉप, पिठाची चक्की असे विविध शेती उपयोगी व संसारोपयोगी साहित्यांचे दरवर्षी वाटप करण्यात येते. सदर साहित्य विशिष्ट समाजातील व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबियातील एका व्यक्तीच्या नावे दिले जाते; परंतु हे साहित्य अनेक वेळा अधिकारी, पदाधिकारी व दलाल, ग्रामीण स्तरावरील सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी करून गरजवंत लाभधारकांना योजनेपासून प्रत्यक्ष लाभापासून वंचित ठेवून तिसर्‍याच व्यक्तीला लाभ दिल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनी अप्रत्यक्षरीत्या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसते. प्रशासनाने मागील दोन वर्षांचा आढावा घेऊन लाभधारकाची चौकशी केली, तर लाभार्थ्यांकडे साहित्य आढळून येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक वेळा आलेले साहित्य हे लाभार्थ्यांना मंजूर होऊनसुद्धा दिले जात नाही. अशावेळी लाभधारक चकरा मारू न थकतो व पाठपुरावा करण्याचे सोडून देतो. याचा फायदा संबंधित अधिकारी, पदाधिकारी घेतात. ते दलालामार्फत उचलून परस्पर त्या साहित्याची विल्हेवाट लावून आपले चांगभले करून घेत आहेत. (वार्ताहर) साहित्य मिळविण्यात दलाल आघाडीवर पंचायत समितीमध्ये दलालांचा बोलबाला असून गरजवंतांना साहित्य घेण्यासाठी कार्यालयात अनेक अडचणी येतात; मात्र दलालामार्फत होणारे काम तात्काळ केले जाते. तालुक्यातील गंगापूर शहरालगत १५ कि़मी. अंतरावर असलेल्या गावामधील एकाच कुटुंबात नाव बदलून तर काहीचे जातीचे प्रमाणपत्र सुद्धा छायांकित प्रतीवर खाडाखोड करून लाभ घेण्याचे प्रमाण दलालामार्फत वाढले आहेत. याकडे कुणाचेही लक्ष नाही. ‘चिरीमिरी’ दिली तरच फाईल जाते मंजुरीला संबंधित अधिकारी लाभधारकाकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय फाईल मंजुरीसाठी पाठवतच नाही. अधिकारी व लाभधारक यांची चर्चा पंचायत समिती परिसरात असलेल्या हॉटेल, पानटपर्‍या येथेच घडून येताना दिसते. गेल्या अनेक वर्षांपासून पंचायत समितीमधील गोडावूनमध्ये अधिक योजनांचे साहित्य धूळखात पडलेले आहे. एकाच ठिकाणी पडलेले साहित्य खर्‍या लाभधारकापर्यंत का पोहोचू शकले नाही, याचा उलगडा होणे अत्यंत गरजेचे आहे.