शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पं.दीनदयाळ उद्यान ११ वर्षांपासून बंद

By admin | Updated: May 16, 2014 00:14 IST

संजय खाकरे , परळी उन्हाळ्याचे दिवस म्हटले की, मौजमजा, मस्ती, अभ्यास नाही, आई-वडिलांचे ओरडणे नाही.

संजय खाकरे , परळी उन्हाळ्याचे दिवस म्हटले की, मौजमजा, मस्ती, अभ्यास नाही, आई-वडिलांचे ओरडणे नाही. केवळ मित्रांसोबत दंगा, मस्ती हे सर्व नियोजन असते ते चिमुकल्यांचे. हे नियोजन करताना या चिमुकल्यांच्या मनात मामाच्या गावी गेल्यानंतर बगीचा, उद्यान इ. भागात खेळणे, बागडणे एवढेच असते. परंतु परळी येथे चिमुकल्यांसाठी व वृद्धांना निवांत वेळ घालविण्यासाठी उभारण्यात आलेले पं. दीनदयाळ उद्यानाचे सध्या तीन तेरा झाले असून, या उद्यानाचा वापर नगर परिषदेने पाईप, वीट, रेती आदी साहित्य ठेवण्यासाठी केला आहे. त्यामुळे चिमुकल्यांनी खेळायचे कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येथील औद्योगिक वसाहतीतील पं. दीनदयाळ उद्यान भुईसपाट झाले आहे. या उद्यानाचा वापर नगर परिषदेचे पाईप ठेवण्यासाठी केला जात आहे. तसेच विटाचे व रेतीचे ढिगारेही साचविण्यात आले आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, लोखंडी खेळण्या मोडून पडल्या आहेत. या परिसरातील बालकांना व नागरिकांना या उद्यानाचे दरवाजे मागील ११ वर्षांपासून बंदच आहेत. मागील दहा वर्षाच्या काळात अनेक नगराध्यक्ष आले, गेले मात्र याकडे कोणीही जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही. विशेष म्हणजे आताचे नगराध्यक्षही याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. या औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या उद्यानात पावरलूम, स्नेहनगर, मलिकपुरा, वडार कॉलनी आदी भागातील चिमुकले येथे खेळण्यासाठी येत असतात. हे उद्यान अनेक वर्ष चालले. परंतु मागील ११ वर्षांपासून या उद्यानाची कुठलीही दुरुस्ती करण्यात आली नाही. अगोदरच प्रदूषणामुळे परळीकर त्रस्त असून, त्यातच वृक्षारोपणाची लागवड होत नसल्याने ही परिस्थिती आणखीनच बिकट बनली आहे. या उद्यानात असलेले सौर ऊर्जेचे दिवे तसेच कारंजेही नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. या उद्यानाची दुरुस्ती करुन हे उद्यान चिमुकल्यांसाठी खेळण्या योग्य करावे, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष श्रीकांत पाथरकर, वैजनाथ दहातोंडे, माजी नगरसेवक प्रकाश जोशी यांनी केली आहे. याबाबत नगराध्यक्ष दीपक देशमुख म्हणाले, पं.दीनदयाळ उद्यानाच्या दुरुस्तीसाठी शासनस्तरावर प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न चालू आहेत.