शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक हातात पोहोचणार पोलचिट

By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत पोलचिट वाटप दोन दिवसांत सुरू होणार आहे

लातूर : लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत पोलचिट वाटप दोन दिवसांत सुरू होणार आहे. १३ आॅक्टोबरपूर्वी वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, आयोगाच्या या पोलचिटवर मतदान केंद्राची माहिती देण्यात येणार आहे.मतदारांना वाटप करण्यात येत असलेल्या पोलचिटवर मतदाराचे छायाचित्र, मतदान केंद्राचे नाव, ज्या परिसरात मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्राचा उल्लेख या पोलचिटवर असणार असून, आयोगाने दिलेले ओळखपत्र मतदारांकडे नसेल, तर या पोलचिटच्या आधारे मतदारांना मतदान करता येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रनिहाय वाटपाची प्रक्रिया करण्यात येत आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ३ लाख २८ हजार २६५ मतदार आहेत. त्यादृष्टीने पोलचिट छापण्यात आल्या आहेत. लातूर ग्रामीणमध्ये २ लाख ९३ हजार ५६१, अहमदपूर विधानसभा मतदारसंघात २ लाख ८९ हजार ४६९, उदगीर विधानसभा मतदारसंघात २ लाख ७० हजार ८८०, निलंगा विधानसभा मतदारसंघात २ लाख ८५ हजार ३४ आणि औसा विधानसभा मतदारसंघात २ लाख ५७ हजार १३० असे एकूण जिल्ह्यात १७ लाख २४ हजार ३३९ मतदार आहेत. ही मतदारांची संख्या लक्षात घेऊन पोलचिट जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत छापण्यात येत आहेत. दोन दिवसांनंतर विधानसभानिहाय मतदारसंघांतील प्रत्येक केंद्रांतर्गत मतदान केंद्राध्यक्षांच्या टीमच्या वतीने या पोलचिटचे वाटप होणार आहे. सर्व मतदारांना निवडणूक आयोगाची मतदान चिठ्ठी मिळणार आहे. प्रत्येक मतदारांच्या हाती निवडणूक आयोगाची मतदान चिठ्ठी पडावी, यादृष्टीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. प्रत्येक घरोघरी जाऊन पोलचिट देण्यात येणार आहे. यापूर्वी उमेदवारांना पोलचिट वाटपाची परवानगी होती. परंतु, गेल्या लोकसभा निवडणुकीपासून मतदान चिठ्ठी आयोगामार्फत वाटण्यात येत आहे. उमेदवारांकडून वाटप करण्यात येत असलेल्या पोलचिटवर पक्षाचे चिन्ह व त्याची जाहिरातबाजी होत असे. त्यामुळे आयोगाने हे निर्बंध घालून स्वत: मतदान चिठ्ठी वाटपाचा निर्णय गेल्या लोकसभा निवडणुकीपासून घेतला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक केंद्रावर वाटपाची प्रक्रिया सुरू होत आहे. (प्रतिनिधी)