शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयवादात राजकीय सौजन्याची ऐशीतैशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 23:48 IST

जालना शहर वा जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवत लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे हे त्या भागाच्या भवितव्यासाठी चांगलेच असते.

राजेश भिसे जालनाशहर वा जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवत लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे हे त्या भागाच्या भवितव्यासाठी चांगलेच असते. पण केलेल्या विकास कामांवरुन राजकीय सौजन्याची ऐशीतैशी करीत इतरांचा ‘बाप’ काढणे कुठल्या राजकीय संस्कृतीत बसते, हाच खरा सवाल आहे. राजकीय शिष्टाचार पाळून लोकप्रतिनिधींनी जनमानसात आपली प्रतिमा ठेवावी, हाच शिरस्ता राजकारणात राहिलेला आहे. याला जालन्यात माजी आमदाराने छेद दिल्याने राजकीय ‘संस्कृतीचे’ चांगलेच प्रदर्शन झाले, हे मात्र खरे!जालना नगर पालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या चंदनझिरा भागात वैशिष्ट्यपूर्ण निधीतून विविध विकास कामे करण्यात आलेली आहेत. केंद्र आणि राज्यात भाजपा व शिवसेनेची सत्ता आहे. तर जालना नगर पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. आतापर्यंत सत्ता संघर्षामुळेच शहर विकासापासून कोसो दूर राहिले आहे, हे नाकारुन चालणार नाही. पक्षीय मतभेद बाजूला ठेवत भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गत वर्षांत शहरातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला. याच निधीतून अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत. सार्वजनिक ठिकाणी राजकीय सभ्यता आणि शिष्टाचाराचे सर्वांनीच पालन करणे अपेक्षित आहे. पण भाजपाने काही दिवसांपूर्वी रस्ते काँक्रिटीकरणाचे उद्घाटन पक्षीय पातळीवर केले. यात शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षा व शहराच्या स्थानिक आमदारांना डावलण्यात आले. यातूनच वादाची ठिणगी पडली. दुसरा प्रकार चंदनझिरा भागात विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने घडला. काँग्रेस आणि भाजपाने विकास कामांचे स्वतंत्र उद्घाटने केली. यातूनच राजकीय संघर्षाने सर्वोच्च बिंदू गाठला. शहरातील माजी आमदाराने राज्यस्तरीय नेत्यावर टिका करताना खालची पातळी गाठल्याने राजकीय शिष्टाचाराचे धिंडवडे निघाले. आगामी काळात दोन्ही राजकीय पक्षांतील नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र होईल, अशी शक्यता सद्यस्थितीवरुन दिसून येते आहे. राजकारणात कुणी कायमचा मित्र वा शत्रू नसतो, हे खरे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राजकीय ‘सभ्याचार’ पाळूनच लोकप्रतिनिधींनी टीका करावी हीच अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.