शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरती ; उद्या लेखी परीक्षा

By admin | Updated: June 17, 2014 01:13 IST

उस्मानाबाद : पोलिस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या १२४५ उमेदवारांची बुधवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे़

उस्मानाबाद : पोलिस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीस पात्र ठरलेल्या २३२३ उमेदवारांपैकी शासकीय नियमानुसार पात्र ठरलेल्या १२४५ उमेदवारांची बुधवारी पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे़जिल्हा पोलिस दलाच्या अस्थापनेवरील १४० पोलिस शिपाई पदासाठी ६ ते ११ जून या कालावधीत पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर भरती प्रक्रियेच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या़ शारीरिक, मैदानी चाचणीत एकूण २३२३ उमेदवार पात्र ठरले होते़ यात ज्या उमेदवारांना ५० पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले असून, त्यातील शासकीय नियमाप्रमाणे १:१५ या प्रमाणात १२४५ युवक-युवती उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले आहेत़ या उमेदवारांची चेस्ट क्रमांक व प्रवर्ग निहाय निकाल पोलिस मुख्यालयातील नोटीस बोर्डावर लावण्यात आला असून, जिल्हा पोलिस दलाच्या वेबसाईटवरही प्रसिध्द करण्यात आला आहे़ तसेच लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या नमुना व सूचनांचा फलक उमेदवारांच्या माहितीसाठी लावण्यात येणार आहे़ लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची बुधवारी सकाळी ७ वाजता पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर परीक्षा घेण्यात येणार आहे़ उमेदवारांना बँक कॉलनीकडील मार्गावरून कागदपत्र पडताळणीनंतर परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे़ तरी उमेदवारांनी ओळखपत्र, परीक्षा पॅड घेऊन वेळेवर हजर रहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)तर होणार कारवाईपरीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांकडे परीक्षेदरम्यान कॅल्क्युलेटर, मोबाईल, पुस्तक, चिठ्ठी आदी साहित्य आढळून आल्यास त्यांना परीक्षेतून अपात्र ठरिवण्याची कारवाई करण्यात येणार आहे़ त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी वरील साहित्य जवळ बाळगून कॉपी करताना आढळून आल्यास त्यांना परीक्षेतून अपात्र ठरविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.