शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस बदल्यांचा घोळच घोळ...!

By admin | Updated: May 31, 2014 01:06 IST

जालना : जिल्हा पोलिस यंत्रणेअंतर्गत वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा घोळात घोळ सुरू

जालना : जिल्हा पोलिस यंत्रणेअंतर्गत वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा घोळात घोळ सुरू असून, आतापर्यंत दोन वेळा निघालेले बदली आदेश रद्द झाल्याने बदल्यांची तिसरी यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. सोयीच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांना पंधरा दिवस उलटूनही अंमलबजावणी झालेली नाही. आतापर्यंत या बदल्यांमध्ये दोन वेळा फेरबदल केले असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली असून, बहुतांश पोलिसांनी प्रशासनावर दबावतंत्राचा वापर केल्यामुळेच बदल्यांचा घोळ सुरू असल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी जिल्ह्यातील ४६५ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या होत्या. सुटीवर जाण्यापूर्वी हे आदेश त्यांनी जारी केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली होती. निकष ठरवून नियमानुसार या बदल्या करण्यात आल्या. मात्र दरम्यानच्या काळात सिंह सुटीवर गेल्याने बदल्यांचा गोंधळ सुरू झाला. आतापर्यंत दोनवेळा बदल्यांची यादी बदलण्यात आली. आता तिसर्‍या यादीची प्रतीक्षा लागली आहे. मुरब्बी पोलिस कर्मचार्‍यांची बदली टाळण्यासाठी अधिकार्‍यांशी ‘अर्थपूर्ण’ चर्चा केल्याची कुजबूज सुरू झाली आहे. त्यामुळे सोयीची यादी तयार होण्यावर कोणाचेही एकमत होत नसल्याने बदली प्रक्रीया अजूनही रखडल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्हा पोलिस यंत्रणेअंतर्गत या खेळामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेले अनेक पोलिस कर्मचारी त्रस्त झाले आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीच बदल्या झाल्या तर पाल्यांना सोयीच्या शाळेत प्रवेश दिला जाऊ शकतो. मात्र गोंधळ अजूनही कायम असल्याने मोठी अडचण झाली आहे. अनेक कर्मचार्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन्हीही याद्यांमधून संबंधित कर्मचार्‍यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. पंधरा दिवसातही काहीच ठोस कारवाई होऊ शकली नाही. ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी सुरू केलेल्या खेळामुळेच हे प्रकार होत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यात पोलिस दलातील या खेळामुळे मोठी गोंधळावस्था उभी राहिली आहे. या जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आ वासून उभा राहिला असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या गैरहजेरीतील हे प्रकार धक्कादायक आहेत. त्यामुळेच पेच प्रसंग उभे राहिले आहेत. (प्रतिनिधी)पोलिस अधीक्षकांनी बदलीचे आदेश २१ मे २०१४ रोजी काढले होते. या आदेशाची अंमलबजावणी करतांना उपअधीक्षक (गृह) वसावे यांनी बदलीची यादी जाहीर केली. मात्र ही यादी तब्बल आठ दिवसांनी मागे घेण्यात आली. पुन्हा २९ मे २०१४ रोजी दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. लागोलाग ही यादीही रद्द झाली असून आता तिसरी यादी जाहीर होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.