डीएमआयसीतही राबविणार ‘प्लग अॅण्ड प्ले’!
By Admin | Updated: September 10, 2014 00:53 IST2014-09-10T00:38:22+5:302014-09-10T00:53:52+5:30
गजानन दिवाण, औरंगाबाद डीएमआयसी प्रकल्पामुळे औरंगाबादसह मराठवाड्याचे रूपडे बदलून जाणार आहे.

डीएमआयसीतही राबविणार ‘प्लग अॅण्ड प्ले’!
गजानन दिवाण, औरंगाबाद
डीएमआयसी प्रकल्पामुळे औरंगाबादसह मराठवाड्याचे रूपडे बदलून जाणार आहे. जपानसारख्या देशाचे बुस्टर अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तेथून येणाऱ्या छोट्यातल्या छोट्या कंपनीलासुद्धा येथे गुंतवणूक करण्यात अडचण येऊ नये, यासाठी गुडगावमधील ‘निमराणा पार्क’प्रमाणेच डीएमआयसीमध्येही एक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तंत्रज्ञान त्यांचे उत्पादन आमचे. केवळ यंत्रसामुग्री आणली की काम सुरू. अशी ही ‘प्लग अॅण्ड प्ले’ संकल्पना येथे सुरू करण्यात येणार आहे. यासाठी उद्योजकांनी तयारी सुरु केली असल्याची माहिती उद्योजक राम भोगले आणि विवेक देशपांडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेल्याच आठवड्यात झालेल्या जपान दौऱ्यात उद्योजकांच्या शिष्टमंडळात या द्वयांचा समावेश होता. या दौऱ्यात त्यांना काय अनुभव आले? दौऱ्याचा देशाला/महाराष्ट्राला/मराठवाड्याला आणि विशेषत: औरंगाबादला काय फायदा होईल? अशा प्रश्नांची उत्तरे देत भोगले आणि देशपांडे यांनी औरंगाबादच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र समोर आणले.
डीएमआयसीचे श्रेय राजेंद्र दर्डा यांनाच!
तत्कालीन उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यामुळेच डीएमआयसीमध्ये औरंगाबादचा समावेश झाला. वैयक्तिक त्यांनी यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यामुळे डीएमआयसीला औरंगाबादला जोडण्याचे संपूर्ण श्रेय दर्डा यांनाच जाते, अशी प्रतिक्रिया उद्योजक राम भोगले यांनी दिली.
पुढचे शतक आशियाई देशांचेच
पुढचे शतक हे आशियाई देशांचेच असेल, असे जगभरातून सांगितले जात आहे. पण ते वास्तवात कसे येणार, याचा उलगडा कोणी करीत नाही. भारत-जपान मैत्रीच्या नव्या अध्यायाने हा उलगडा झाला आहे.
विस्तार नव्हे, विकास
आम्हाला विस्तार नव्हे, विकास करायचा आहे, असा संदेश मोदींनी जगभराला दिला. माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही आणि तुम्हाला माझ्याकडून घेण्यासारखे काही. म्हणून मी तुम्हाला भगवद् गीता देत आहे. हिरोशिमा-नागासाकीवरील बॉम्ब हल्ल्यानंतर सर्व जण यंत्राच्या साहाय्याने मृतदेह उचलत होते. मात्र, स्वत:च्या हाताने मृतदेह बाहेर काढणारे एकमेव भारतीय होते, असे सांगत मोदींनी जपानी लोकांची मने जिंकली.
निमराणा प्रकल्प म्हणजे काय?
- जपानमधील छोट्या-छोट्या कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून गुडगावमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. एखादी कंपनी यायची म्हटली तर अनेक परवानग्यांची गरज असते. छोट्या गुंतवणूकदारांना अशा परवानग्या घेणे अवघड असते. अशा उद्योजकांना विविध परवानग्यांसाठी ठिकठिकाणी खेट्या मारण्याची गरज नाही. या प्रकल्पात गुंतवणूकदारांनी आपली यंत्रसामुग्री जोडली की बस. लगेच उत्पादनाला सुरूवात करता येते.
डीएमआयसीमध्ये हे कसे शक्य आहे?
- डीएमआयसीला सुरुवातीपासून जपान सरकारने मदत केली आहे. जपानमधील अनेक उद्योजक येथे गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. त्यांना वेगवेगळ्या परवानग्यांसाठी त्रास होऊ नये, यासाठी ‘प्लग अॅण्ड प्ले’ प्रकल्प राबविण्याचा विचार सीएमआयच्या माध्यमातून सुरू झाला आहे. याआधी जपानमध्ये आमचे काही लोक गेले होते. आता आम्ही गेलो होतो. काही दिवसांनी ५० लोकांचे आणखी एक शिष्टमंडळ जाणार आहे. कुठल्याही प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण ही सर्र्वांत मोठी (पान ७)