विकास आराखड्यातील रस्त्यावर प्लॉटिंग; पेठेनगर येथील सहा पक्की घरे जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:41 IST2025-05-28T19:40:41+5:302025-05-28T19:41:33+5:30

पेठेनगर येथील पक्की घरे मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केली.

Plotting on the road in the development plan; Six houses in Pethenagar demolished | विकास आराखड्यातील रस्त्यावर प्लॉटिंग; पेठेनगर येथील सहा पक्की घरे जमीनदोस्त

विकास आराखड्यातील रस्त्यावर प्लॉटिंग; पेठेनगर येथील सहा पक्की घरे जमीनदोस्त

छत्रपती संभाजीनगर : भीमनगर (उत्तर) भागातील पेठेनगर सर्व्हे क्रमांक ३२ येथे विकास आराखड्यातील १५ मीटर रुंद रस्त्यावर प्लॉटिंग करण्यात आली. गोरगरीब नागरिकांनी प्लॉट घेऊन घरे बांधली. मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने एक पक्के तर पाच कच्ची घरे जमीनदोस्त केली. सर्व प्लॉटधारकांकडे खरेदीखत आहेत, हे विशेष.

जुन्या विकास आराखड्यातील अनेक रस्त्यांवर भूमाफियांनी प्लॉटिंग केली. गोरगरीब नागरिकांना या संदर्भात माहिती नसते. प्लॉट घेताना ते कोणत्याही प्रकारची चौकशीही करीत नाहीत. स्वस्त प्लॉट भेटत असल्यामुळे नागरिक प्लॉट घेतात. पेठेनगर येथील नागरिकांनीही अशा पद्धतीने प्लॉट घेऊन घरे बांधली होती. काही दिवसांपूर्वीच मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने विद्यापीठातील ‘साई’च्या भिंतीला लागून असलेल्या मालमत्ताधारकांना एप्रिल महिन्यात नोटीस दिली. नोटिसा पाहून नागरिकांच्या पायाखालची वाळू घसरली. स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आला.

मंगळवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांच्यासह पथक कारवाईसाठी आले. प्रारंभी नागरिक, महिलांनी कडाडून विरोध दर्शविला. मनपाने छावणी पोलिसांकडून अतिरिक्त कुमक मागवली. त्यानंतर, जेसीबीच्या साह्याने सायंकाळपर्यंत ६ घरे जमीनदोस्त केली. ही कारवाई सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक मुकेश खडसे, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, अशोक कदम, जेसीबी चालक गणेश दराडे आदींनी केली.

Web Title: Plotting on the road in the development plan; Six houses in Pethenagar demolished