छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, पण एलपीजीचा ठणठणाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 20:06 IST2026-03-30T20:06:28+5:302026-03-30T20:06:55+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाराऱ्यानंतर काही प्रमाणात परिस्थिती पूर्वपदावर

Petrol and diesel supply is smooth in Chhatrapati Sambhajinagar, but LPG supply is disrupted | छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, पण एलपीजीचा ठणठणाट

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, पण एलपीजीचा ठणठणाट

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर साठा आल्याने रविवारी कुठेही वाहनांच्या रांगा असल्याचे चित्र नव्हते. दुसरीकडे एलपीजी दरांचा आणि साठ्याचा तिढा सुटला नसल्याने बहुतेक सर्वच एलपीजी पंप बंदच असल्याने रिक्षाचालकांना गॅससाठी वणवण फिरावे लागले, मात्र त्यांना गॅस मिळाला नाही. पब्लिक क्राय वाढल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी २७ रोजी पेट्रोल पंपधारक आणि कंपनी प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली होती. यात एजन्सी आणि कंपन्यांतील अंतर्गत वादामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे समोर आले होते. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनी आणि वितरकांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला हाेता. शनिवारी रात्रीपासूनच या इशाऱ्याचा परिणाम दिसून आला.

शहरात आठ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलसाठी पंपांवर रांगा कमी-अधिक प्रमाणात दिसत आहेत. मागणी आणि पुरवठा यात कंपनी आणि वितरकांमध्ये समन्वयाचा अभाव झाल्याने सर्व व्यवस्था कोलमडली.

पीएनजी किट बसविली, पण गॅस पाइपलाइन नाही
शहरातील झाेन क्र. ५, ८, ९ मधील घरांना पीएजनी किट बसविली आहे. परंतु, गॅस पुरवठ्याची पाइपलाइन नाही. कुंभेफळ, बजाजनगर, वाळूज महानगर- १ मध्ये १२ हजार १४२ कनेक्शन सुरू आहेत. त्यापैकी मनपा हद्दीत ३ हजारांच्या आसपास कनेक्शन ॲक्टिव्ह आहेत. शहरात एलपीजीचे १३ ते १४ पंप असून यात गो-गॅसचे चार पंप आहेत. आज सर्वच पंप बंद आहेत. एलपीजी गॅसच्या दराबाबत तक्रारी आहेत. या दरावर प्रशासनाचे नियंत्रण नाही, गॅसचे दर वाढले आहेत. आजचा दर १२० रुपये किलो आहे. शहरात गॅसचे वेगवेगळे दर असल्याची तक्रार अंबादास दानवे यांची होती. याची आम्ही तपासणी करणार आहोत. दरात तफावत असेल तर गुन्हे दाखल करू.
- प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी

एलपीजी गॅस पंपांवर लूट होत असल्याचा आरोप
शहरातील एलपीजी गॅस पंपावर लूट होत असल्याचा आरोप आहे. एकाच पंपावर, एकाच दिवशी आणि एकाच उत्पादनाचे दोन वेगवेगळे दर आकारल्याच्या पावत्या उद्धवेसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सोशल मीडियातून व्हायरल केल्या आहेत. मनमानी दर लावून गॅसचा सर्रास काळाबाजार सुरू आहे, मात्र येथील पुरवठा विभाग त्याची साधी दखलही घेत नाही. ही मुजोरी ब्रिटिशांच्या अन्यायापेक्षाही भयानक आहे. अशी टीका पोस्टमध्ये दानवे यांनी केली आहे. गॅसचा साठा उपलब्ध असेपर्यंत पंप २४ तास सुरू ठेवण्यात यावेत. गॅस भरल्यानंतर त्याचे अधिकृत देयक (पावती) रिक्षाचालकांना देण्यात यावी. रिक्षाचालकांकडून 'ऑनलाइन पेमेंट' द्वारे रक्कम स्वीकारण्यात यावी. उपलब्ध गॅस साठ्याची माहिती देण्यासाठी दर्शनी भागात ठळक फलक लावण्यात यावेत. 'अफवा-अफवा' असा जप करणाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा रिक्षाचालकांच्या सोबतीने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दानवे यांनी दिला आहे.

Web Title : छत्रपति संभाजीनगर: पेट्रोल-डीजल आपूर्ति सुचारू, एलपीजी की कमी

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में पेट्रोल और डीजल की आपूर्ति सामान्य हुई, लेकिन एलपीजी की कमी बनी हुई है। एजेंसियों के बीच विवादों के कारण कमी हुई। अधिकारियों ने एलपीजी पर मूल्य वृद्धि के खिलाफ कार्रवाई की चेतावनी दी, साथ ही बढ़ी हुई दरों और कालाबाजारी की शिकायतें भी मिलीं।

Web Title : Chhatrapati Sambhajinagar: Petrol & Diesel Supply Smooth, LPG Scarce

Web Summary : Petrol and diesel supplies normalize in Chhatrapati Sambhajinagar, but LPG remains scarce. Disputes between agencies caused shortages. Authorities warned of action against price gouging on LPG, following complaints of inflated rates and black marketing.