शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून पारगावची शाळा ‘हायटेक’ !

By admin | Updated: February 4, 2016 00:36 IST

संजय तिपाले , बीड जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की, तुटक्या खिडक्या, गळके छत, तडे गेलेल्या इमारती असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, पारगाव जोगेश्वरी (ता. आष्टी) येथील शाळा त्याला अपवाद ठरली आहे.

संजय तिपाले , बीडजिल्हा परिषदेची शाळा म्हटले की, तुटक्या खिडक्या, गळके छत, तडे गेलेल्या इमारती असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, पारगाव जोगेश्वरी (ता. आष्टी) येथील शाळा त्याला अपवाद ठरली आहे. घोकमपट्टी, पाठांतर ही पारंपरिक शिक्षणपद्धती शाळेने कधीच बाजूला सारली आहे. येथे ऊसतोड कामगार व पारधी कुटुंबियांची मुलेही आता ‘प्रोजेक्टर’द्वारे ‘हायटेक’ शिक्षण घेत आहेत. ज्ञानरचनावादी या उपक्रमशील शिक्षणपद्धीला लोकसहभागाची जोड मिळाल्याने ही किमया झाली.बीड व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील पारगाव जोगेश्वरी हे या ३ हजार लोकसंख्येच्या गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. जोगेश्वरी देवीच्या पुरातन मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले हे गाव आता ज्ञानरचनावादी शिक्षणाचे ‘रोल मॉडेल’ म्हणून पुढे येत आहे. परिसरात ऊसतोड कामगार व पारधी पेढ्या असल्याने शाळेतील सव्वादोनशेपैकी निम्मे विद्यार्थी याच उपेक्षित घटकातील! विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागावा यासाठी शिक्षकांनी गेल्या दीड वर्षांपासून विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले. विद्यार्थ्यांच्याच मदतीने प्रत्येक वर्गासाठी शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण केले. विद्यार्थ्याची आवड, क्षमता तपासून त्यानुसार त्याला घडविण्याचा उपक्रम सुरु झाला. त्यामुळे पारधी व ऊसतोड कामगार कुटुंबांतील मुले आता फाडफाड इंग्रजी वाचत- बोलत आहेत. शिष्यवृत्ती, विज्ञान प्रदर्शन, नवोदय परीक्षा यामध्येही विद्यार्थ्यांनी ठसा उमटविला आहे.संजय व भीमराव गुरव यांनी २००४ मध्ये शाळेसाठी स्वत:ची अडीच एकर जमीन दान दिली होती. त्याच जागेच सात वर्गांसाठी हक्काचे छत असून एकूण दहा खोल्यांचे बांधकाम आहे. शाळेत खेळाच्या साहित्यापासून ते वाद्यवृंदापर्यंत सारे काही उपलब्ध केले आहे. शाळेतील फरशांवर अंकगणित, भूमिती, मराठी, इंग्रजी शब्दकोडे, घड्याळ रंगरंगोटीतून साकरले आहे. त्यामुळे विद्यार्थी मधल्या सुटीत त्यावर रमताना दिसतात. शाळेच्या परिसरात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब साचविला जातो. या पाण्यावरच फुलझाडे बहरली आहेत. परसबागेतच पोषण आहारासाठी लागणारी भाजीपाला पिके घेतली जातात. मुख्याध्यापक मधुकर मोरे, शिक्षक विष्णू नेहरकर, सोमनाथ वाळके, सलाउद्दीन सय्यद, परमेश्वर धस, राजेंद्र पवार, प्रदीप कोकाटे, सोनाली राऊत, केशर भोसले हे सर्व जण उपक्रमशील शिक्षणासाठी प्रयत्नशील असतात.