शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

श्री विसर्जनाच्या तोंडावर पॅचवर्क

By admin | Updated: September 8, 2014 00:35 IST

औरंगाबाद : महापालिकेने श्री गणेश विसर्जनाच्या तोंडावर मुख्य रस्त्यांवरील पॅचवर्क करण्यासाठी आज सकाळी काम हाती घेतले.

औरंगाबाद : महापालिकेने श्री गणेश विसर्जनाच्या तोंडावर मुख्य रस्त्यांवरील पॅचवर्क करण्यासाठी आज सकाळी काम हाती घेतले. मात्र, सायंकाळी झालेल्या रिमझिम पावसामुळे खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेला मुरूम वाहून गेल्याने श्री विसर्जन मार्गावर खड्डे कायम राहिले. व्हाईट टॉपिंगच्या रस्त्यांची कामे सुरू असल्याचे सांगून या वर्षी पॅचवर्क मे महिन्यातच संपविण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारे पॅचवर्क यंदा करण्यात आले नाही. जून, जुलै महिन्यांत पॅचवर्कचे काम संथगतीने सुरू होते. ५० कोटी रुपयांच्या व्हाईट टॉपिंगच्या रस्त्यांमुळे पॅचवर्कचे काम हाती घेण्यात आले नाही. पॅचवर्कसाठी साडेतीन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. सहा प्रभागांसाठी ६० ते ७० लाख रुपये पॅचवर्कसाठी ठेवण्यात आले आहेत. असे असताना गणेश विसर्जनाच्या तोंडावर पालिकेने पॅचवर्क सुरू केले. मुख्य मिरवणूक श्री संस्थान गणपती येथून निघणार असून, तो मार्ग सध्या चांगला आहे. मात्र, एन-१२, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, जालाननगर या भागांतील रस्ते खड्डेमयच आहेत. त्यामुळे तेथे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पॅचवर्क होणे महत्त्वाचे होते. जबाबदारी कुणाकडे ?कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, सिकंदर अली, अफसर सिद्दीकी यांच्याकडे सहा प्रभागांतील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाच्या देखरेखीची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रशासकीय सूत्रांनी सांगितले की, काही भागांमध्ये पॅचवर्क करण्यात आले आहे. मुकुंदवाडी श्री विसर्जन मिरवणूक मार्ग संघर्षनगरपर्यंत आहे. त्या रस्त्यावरील खड्डे बुजविले होते. मात्र, पावसामुळे पुन्हा खड्डे झाले. औरंगपुरा विहिरीपर्यंतचा मार्ग सुरळीत करण्यात आला आहे. काही ठिकाणी डांबरीकरणातून पॅचवर्क करण्यात आले. एन-१२ मिरवणूक मार्गाचे काम आज हाती घेण्यात आले आहे.