शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पार्किंगची समस्या; वाहन खरेदी करावे की नाही?

By admin | Updated: December 1, 2014 01:26 IST

औरंगाबाद : शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने तसेच अनेक दुकानदारांनीच अतिक्रमणे करून आपली दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहन कुठे लावावे,

औरंगाबाद : शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने तसेच अनेक दुकानदारांनीच अतिक्रमणे करून आपली दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहन कुठे लावावे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होत आहे. त्यामुळे वाहन घेऊनही या शहरात फारसा उपयोग नाही, अशी नागरिकांची मनोभूमिका बनत चालली असल्याचे दिसते. जुन्या शहरात गुलमंडी, औरंगपुरा, सिटी चौक, सराफा, शाहगंज, रोशनगेट, चेलिपुरा, बुढीलेन, दलालवाडी या परिसरात सकाळी व सायंकाळी नागरिकांची मोठी गर्दी असते. शहराच्या इतर भागांतून सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक खरेदीसाठी या भागात येतात. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची गर्दी असते. विशेष करून शनिवारी आणि रविवारी अधिक गर्दी असते. पैठणगेट ते गुलमंडी आणि गुलमंडी ते औरंगपुरा या रस्त्याचे रुंदीकरण होऊनही या ठिकाणी वाहतूक खोळंबते. गुलमंडीवर दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ आहे, तर पैठणगेट येथे चारचाकी वाहनांसाठी तळ आहे. मात्र, पैठणगेट येथे वाहन लावून गुलमंडीपर्यंत पायी जाणे अनेक नागरिक टाळतात. शिवाय औरंगपुरा, निराला बाजार या भागांकडून येणाऱ्या चारचाकीधारकांना कोठे वाहन लावायचे, हा प्रश्न सतावत असतो. सिटी चौक भागात तर दुचाकी वाहन लावायलाही जागा नसते. हीच अवस्था शाहगंज आणि बुढीलेन भागात आहे. शहरातील उस्मानपुरा चौक ते श्रेयनगर आणि उस्मानपुरा चौक ते पीरबाजार या भागातही वाहनतळ नसल्याने रस्त्यावर दुतर्फा वाहने आढळतात. आकाशवाणी चौक ते त्रिमूर्ती चौक व पुढे गजानन महाराज मंदिर तसेच समर्थनगर परिसर या भागातही वाहने लावायला जागा नाही, अशी अवस्था आहे. जालना रस्त्यावर चारचाकी वाहन लावायला जागा नसल्याची परिस्थिती रोजच असते. जालना रस्त्यावर अनेक इमारतींच्या पुढे अतिक्रमण झाले असल्याने तसेच महापालिकेचे एकही वाहनतळ नसल्याने अनेक इमारतींच्या समोर रस्त्यावर वाहने दिसतात. परिणामी, या रस्त्यावरूनही वाहन चालविणे नागरिकांना धोकादायक वाटते.