परभणी मनसे शहराध्यक्ष खंडणीप्रकरणी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:16 IST2019-01-03T23:16:14+5:302019-01-03T23:16:52+5:30
औरंगाबाद : तपोवन एक्स्प्रेसमधील पॅन्ट्रीमधील खाद्यपदार्थ जास्त दराने विक्री करतात, त्याचे बिलही दिले जात नाही, अशी विविध कारणे सांगून ...

परभणी मनसे शहराध्यक्ष खंडणीप्रकरणी अटकेत
औरंगाबाद : तपोवन एक्स्प्रेसमधील पॅन्ट्रीमधील खाद्यपदार्थ जास्त दराने विक्री करतात, त्याचे बिलही दिले जात नाही, अशी विविध कारणे सांगून पॅन्ट्रीकार व्यवस्थापकास मोबाईलवरून १ ते २ लाखांची खंडणी मागणाऱ्या परभणी मनसे शहराध्यक्षाला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (रेल्वे) एस. एस. दहातोेंडे यांनी त्याला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सचिन पाटील (३२, रा.परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पॅन्ट्रीकार सुपरवायझर अशोक चतुर राठोड (रा. गोपालनगर, सांगवी, जि. नांदेड) यांनी तक्रार नोंदविली आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तपोवन एक्स्प्रेसमधील पॅन्ट्रीकारमधील खाद्यपदार्थ अधिक दराने विक्री होते, त्याचे बिलदेखील दिले जात नाही, अशी कारणे सांगत पॅन्ट्रीकारचा परवाना रद्द करू, आंदोलन करूअशी धमकी सदर आरोपीने दि. ३० आॅक्टोबर २०१८ रोजी दिली होती. ३१ आॅक्टोबर रोजी रात्री अशोक राठोड यांना सचिन पाटील आणि उत्तम चव्हाण (रा. संत गाडगेबाबानगर, परभणी) या दोघांनी फोन करून तपोवन एक्स्प्रेसमधील पॅन्ट्रीकार सुरू ठेवण्यासाठी १ ते २ लाख रुपये खंडणी मागितली. तक्रारीवरून लोहमार्ग पोलीस ठाण्यात सचिन पाटील व उत्तम चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एकाला अटक झाली दुसºया आरोपीचा शोध घेतला जात आहे.
७ जानेवारीपर्र्यंत कोठडी
लोहमार्ग पोलिसांनी आरोपी सचिन पाटील याला गुरुवारी अटक करून रेल्वे न्यायालयात हजर केले असता ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सहायक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप साबळे करीत आहेत.