कार रिव्हर्स घेताना जायकवाडीच्या कालव्यात पडली; दाम्पत्यासह मदतीला धावलेला तरुणही बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:47 IST2026-02-24T11:44:15+5:302026-02-24T11:47:31+5:30

जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कार कोसळून भीषण अपघात; तिघांचा जलसमाधीचा धोका, पैठणमध्ये शोधमोहीम सुरू

Paithan Accident: Heartbreaking! Car falls into canal while reversing Near Changatpuri in Paithan; Couple and young man who rushed to help also missing | कार रिव्हर्स घेताना जायकवाडीच्या कालव्यात पडली; दाम्पत्यासह मदतीला धावलेला तरुणही बेपत्ता

कार रिव्हर्स घेताना जायकवाडीच्या कालव्यात पडली; दाम्पत्यासह मदतीला धावलेला तरुणही बेपत्ता

पैठण: पैठण तालुक्यातील चांगतपुरी शिवारात सोमवारी मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. कार रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कोसळली. या अपघातात कारमधील दाम्पत्य वाहून गेले असून, त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेला स्थानिक तरुणही बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

रस्ता चुकला अन् घात झाला
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोरडगाव (ता. पाथर्डी) येथील मुकीद अहमद शेख (३५), निलोफर मुकीद शेख (३०) आणि चालक अल्ताफ पठाण हे पिंपळवाडीकडे निघाले होते. चांगतपुरी गावाजवळील पुलावर आले असता चालक रस्ता चुकला. कार मागे (रिव्हर्स) घेत असताना अचानक नियंत्रण सुटले आणि कार थेट भरून वाहणाऱ्या कालव्यात कोसळली.

मदतीला धावलेला तरुणही बेपत्ता
कार पाण्यात पडल्याचे पाहताच स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले. चांगतपुरी येथील रावसाहेब गणपत खडेकर (४०) या तरुणाने दाम्पत्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तो स्वतःही वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चालक अल्ताफ पठाण याने कसाबसा आपला जीव वाचवला असून त्याच्यावर पैठण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्रीपासून शोधमोहीम सुरू
घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे पोनि. महादेव गोमारे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या साहाय्याने कार कालव्याबाहेर काढण्यात आली, मात्र मुकीद शेख, निलोफर शेख आणि रावसाहेब खडेकर यांचा अद्याप शोध लागलेला नाही. तहसीलदार यांनी जिल्हास्तरावरून आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव पथकाला पाचारण केले असून, शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

Web Title : पैठण में कार नहर में गिरी; दंपति समेत तीन के डूबने की आशंका।

Web Summary : पैठण में एक कार दुर्घटना में नहर में गिरने से एक दंपति और एक बचावकर्मी लापता हो गए। चालक बच गया, और लापता व्यक्तियों का पता लगाने के लिए खोज अभियान जारी है।

Web Title : Car plunges into canal in Paithan; three feared drowned.

Web Summary : A car accident in Paithan resulted in a couple and a rescuer going missing after the vehicle plunged into a canal. The driver survived, and search operations are underway to locate the missing individuals.