शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांपेक्षा सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचाच आक्रमक पवित्रा

By admin | Updated: February 17, 2016 00:38 IST

बीड : चारा छावण्या बंदच्या सोमवारी झालेल्या निर्णयाविरुद्ध मंगळवारी जिल्हाभर संतापाची लाट उसळली. सरकारविरोधात विरोधी प

बीड : चारा छावण्या बंदच्या सोमवारी झालेल्या निर्णयाविरुद्ध मंगळवारी जिल्हाभर संतापाची लाट उसळली. सरकारविरोधात विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी तर रोष व्यक्त केलाच;पण सत्तेत वाटेकरी असलेल्या पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीच अधिक आक्रमक पवित्रा घेतला.सरकार शेतकरी विरोधी आहे... झोपेत धोंडा घातल्यागत निर्णय घेतला...असा सूर आवळत शिवसंग्राम संघटनेच्या पालवण (ता. बीड) येथील छावणीत पशुपालक एकवटले. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याबरोबरच शासननिर्णयाची होळी करण्यापर्यंत टोकाचे पाऊल आंदोलनकर्त्यांनी उचलले. शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के व इतर पदाधिकारी यावेळी अग्रभागी होते. तथापि, शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आ. विनायक मेटे यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारविरोधात रान पेटविण्याचा इशाराही आधीच दिला आहे.दुसरीकडे शिवसेनेच्या वळचणीला असलेले चारा छावणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जटाळ यांनीही सत्ताधाऱ्यांविरुद्ध पत्रक काढले आहे. शेतकऱ्यांची सरकारला जाणीव नाही, असे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे सरकारचे धोरण आहे काय? असा संतप्त सवाल जटाळ यांनी उपस्थित केला आहे. सरकारविरोधात थेट मंत्रालयावर रुमणे मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यातील सत्तेपासून दूर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप आक्रमक पवित्रा घेतलेला नसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)