शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन

By admin | Updated: June 10, 2017 00:15 IST

इयत्ता बारावी व १० वीचा सीबीएसईचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुढील प्रवेश घेण्याकरिता लगबग सुुरू झाली आहे.

१६ ते १८ जून : खास विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक उपक्रमअमरावती : इयत्ता बारावी व १० वीचा सीबीएसईचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुढील प्रवेश घेण्याकरिता लगबग सुुरू झाली आहे. कुठे प्रवेश घ्यायचा, चांगल्या शैक्षणिक संस्था कशा निवडायच्या, प्रवेश घेण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, अशा भरपूर प्रश्नांचे काहूर विद्यार्थ्यांसह पालकांच्याही मनात आहे. याचअनुषंगाने शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या लोकमत समूहातर्फे यंदाही अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर अर्थातच भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. युनिक अ‍ॅकेडमी पुणे मुख्य प्रायोजक आहे. हे शैक्षणिक प्रदर्शन १६ ते १८ जूनदरम्यान संत ज्ञानेश्वर सांकृतिक भवन, आर्ट गॅलरी , मोर्शी रोड,अमरावती येथे सकाळी ११ ते ९ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी दिशादर्शक ठरणार असून या प्रदर्शनामध्ये नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्यंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल. पालक असो वा पाल्य, दोघांच्याही मनात करिअरविषयक असणाऱ्या सर्व समस्यांचे याद्वारे निराकरण केले जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील.महाविद्यालये, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, फॅशन ग्राफीक्स, आयटीआय, मीडिया आदी करिअरविषयक माहिती येथे मिळेल. तसेच विविध विद्यापीठे, कोचिंग क्लासेस या सर्व संस्था या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे, हे निश्चित. या तीन दिवसीय शैक्षणिक प्रदर्शनीला हजारो विद्यार्थी आणि पालक भेट देणार असून शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिकां ंसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची ही अनोखी संधी आहे. यासाठी त्वरित आपले स्टॉल बुक करावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.माहितीचा खजिना होणार उपलब्ध अनेक महाविद्यालये, शाळा अभियांत्रिकी, वैद्यकीय, आर्किटेक्चरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटेरियर डिझाईनरपर्यंत व रिटेल, आयटीआय,एव्हीएशन, मीडिया, अ‍ॅनिमेशन तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, फॉरेन लँग्वेज, स्पोकन इंग्लिश अशा प्रकारच्या विविध शैक्षणिक इन्स्टिट्युट या प्रदर्शनीत सहभागी होणार आहेत. याद्वारे माहितीचा खजिनाच उपलब्ध होणार असल्यामुळे पालकांचा वेळ व पैसा दोन्ही वाचणार आहे.स्टॉल बुकींगसाठी संपर्कमोजकेच स्टॉल शिल्लक असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी त्वरित आपला स्टॉल बुक करावा. स्टॉल बुकींगसाठी ९९२२४२७७९४, ९८८११२२३०० वर संपर्क करावा.प्रदर्शनात राज्यभरातील तसेच जिल्ह्यातील व देशपातळीवरील नामवंत शिक्षण संस्थांचा सहभाग.इयत्ता ११ वी व १२ वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त माहितीप्रदर्शन सर्वांसाठी खुले असल्याने सर्वांना नि:शुल्क प्रवेश दिला जाईल.दि. १६ ते १८ जून रोजी, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, आर्ट गॅलरी, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रदर्शन राहणार आहे.