शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महासंचालकांना ‘मानव हक्क’ चे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:30 IST

राज्य मानव हक्क आयोगाकडे प्रलंबित अथवा दाखल होणाºया सर्व प्रकरणांमध्ये सुनावणीची नोटीस निघाल्यानंतर त्यात संबंधीत जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी स्वत: चौकशी करून चौकशीचे निष्कर्ष स्वत: नोंदवावेत, असा आदेश पोलीस महासंचालकांना दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्य मानव हक्क आयोगाकडे प्रलंबित अथवा दाखल होणाºया सर्व प्रकरणांमध्ये सुनावणीची नोटीस निघाल्यानंतर त्यात संबंधीत जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी स्वत: चौकशी करून चौकशीचे निष्कर्ष स्वत: नोंदवावेत, असा आदेश पोलीस महासंचालकांना दिला आहे.हिंगोली येथील नागेश राजाभाऊ कौठेकर यांना हिंगोली शहर ठाण्याचे तत्कालीन फौजदार सागर इंगोले यांनी चौकशीस बोलावून त्यांना व त्यांचे मामा नारायण लक्ष्मण खलसे यांना मारहाण केल्याची तक्रार पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्याकडे केली होती. त्यांनी ती तत्कालीन ठाणेदार सांगळे यांच्याकडे पाठविली. सांगळे यांनी तक्रारीची थातूर-मातूर चौकशी करून स्वत:च निष्कर्ष काढला होता की, ज्या लोकांनी नागेश कौठेकर यांच्यासारखे बयाण दिले व सर्व हितसंबंधी साक्षीदार आहेत.मानवी हक्क आयोगास असेही निदर्शनास आले की, सदर प्रकरणातील चौकशी अधिकारी सांगळे यांनी पोउपनि इंगोले यांना मदत करण्याच्या हेतूने थातूर-मातूर चौकशी केली. त्यामुळे इंगोले यांच्याविरूद्ध योग्य ती खातेनिहाय कारवाईचे आदेश पारित केले. या निर्णयामुळे पोलीस पिडीतांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सदर प्रकरण हिंगोली येथील नागेश कौठेकर यांनी अ‍ॅड. पी. के. पुरी यांच्यामार्फत राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाखल केले होते. प्रकरणामध्ये आयोगाने आदेशीत केल्याप्रमाणे कौठेकर यांना २५०० हजार रूपये नुकसान भरपाईचा धनादेश संबंधितांकडून प्राप्त झाला आहे.