शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सूचना फलक झाले केवळ शोभेचे बाहुले

By admin | Updated: June 10, 2014 00:33 IST

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई माहिती, सूचना व प्रबोधन यासाठी महत्त्वपूर्ण सूचना बजावणाऱ्या सूचना फलकांचा मुख्य उद्देशच दुरावत चालला आहे.

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाईमाहिती, सूचना व प्रबोधन यासाठी महत्त्वपूर्ण सूचना बजावणाऱ्या सूचना फलकांचा मुख्य उद्देशच दुरावत चालला आहे. तर जाणीवपूर्वक सूचना फलकाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने शिकलेल्यांना सुशिक्षित कसे म्हणायचे? अशी संभ्रमावस्था यामुळे निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे, तर सूचना फलकांच्या बोर्डावर पोस्टर्स चिटकविण्याची जणू काही स्पर्धाच लागल्याने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना सूचना फलक हे त्यांच्या प्रसिद्धीचे मोठे साधन वाटत आहे. पर्यटन स्थळाची माहिती, रस्त्याची वळणे, दिशादर्शक, घाटाची माहिती, धोक्याचा रस्ता अशी महत्त्वपूर्ण माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने सूचना फलकांची निर्मिती झाली. मात्र, सूचना फलकांचा प्रबोधनाचा मुख्य उद्देशच दुरावत चालला आहे. रस्ता अरूंद आहे. वाहने सावकाश चालवा, पुढे शाळा आहे, घाटाचा रस्ता याच्या सचित्र माहितीचे सूचना फलक रस्त्यावर उभे केलेले असतात. हे सूचना फलक मोठी दिशा दर्शवितात व महत्त्वपूर्ण माहिती देऊन जातात. याचा मोठा फायदा वाहनचालकांना होतो. अनेकदा हे सूचना फलक वाटाड्याचे कामही करतात. मात्र, दिवसेंदिवस अशा सूचना फलकांकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने या फलकांचा मुख्य उद्देशच दुरावत चालला आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक, या ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी सूचना फलक, गाड्यांचे वेळापत्रक लटकवलेले असते. तरीही प्रवासी या फलकाचा वापर न करता सर्रास गाडी केव्हा येणार अशी विचारणा करतात. धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे, अशा सूचना वैद्यकीय महाविद्यालय व इतर ठिकाणी लिहिलेल्या आहेत. नेमके या ठिकाणीच पिचकाऱ्या मारल्या जातात. येथे वाहने पार्किंग करू नये, असा फलक दर्शविलेल्या जागी वाहने उभी असतात. सूचना देणाऱ्या फलकाकडे दुर्लक्ष करीत जणू काही मनमानीचा ठेकाच आपल्याला मिळाला आहे, अशा आविर्भावात वागण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. या मनोवृत्तीमुळे सूचना फलकाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत चालली आहे. सूचना फलकांचा उपयोग पोस्टर डकविण्यासाठीसार्वजनिक बांधकाम विभाग व विविध शासकीय विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या सूचना फलकाच्या पाट्यांवर विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षांची पोस्टर्स हमखास डकवितात. परिणामी, हे सूचना फलक झाकले जात आहेत, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राम कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या संदर्भात उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांच्याकडे विचारणा केली असता सूचना फलक लावण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. स्वस्त धान्य दुकानातील भाव फलक अथवा नो पार्किंगचा बोर्ड, धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. या सर्व सूचनांची अंमलबजावणी न झाल्यास शिक्षेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. याबाबत त्या त्या विभागामार्फत ठोस उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे मंदार वैद्य म्हणाले.