शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची मात्र पायपीट

By admin | Updated: May 25, 2014 01:11 IST

विठ्ठल फुलारी, भोकर तालुक्यातील पांडुरणा गावालगत असलेल्या गारगोटवाडी येथे मागील ३५ वर्षांत पाणीपुरवठ्याच्या तीन योजना घेतल्या गेल्या खर्‍या,

विठ्ठल फुलारी, भोकर तालुक्यातील पांडुरणा गावालगत असलेल्या गारगोटवाडी येथे मागील ३५ वर्षांत पाणीपुरवठ्याच्या तीन योजना घेतल्या गेल्या खर्‍या, पण या योजनेचे पाणी उन्हाळ्यात ग्रामस्थांची तहान भागविण्यास अपुरे पडले आहे़ यामुळे गावातील महिलांना अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून पोटभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात पायपीट करावी लागत आहे़ सदरील शेतकरी मारोती खुपसे यांनी आपल्या शेतातील पिके वाळवून पाईपलाईनने ग्रामस्थांना मार्च महिन्यापासून पाणी देत होते़ पण यांच्या विहिरीचे अधिग्रहण २९ एप्रिलपासून दाखविण्यात आल्याने या शेतकर्‍याने पाईपलाईनचे पाणी देणे बंद केले़ यामुळे ग्रामस्थांना आता अर्धा कि़मी़पेक्षा जास्त अंतरापर्यंत पाण्यासाठी डोक्यावर हंडा घ्यावा लागत आहे़ महिला व बच्चे कंपनीही पोटभर पाणी मिळावे म्हणून पायपीट करीत आहेत़ जनावरांचे काय? अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून ग्रामस्थांना पाणी मिळत असले तरी या गावातील जनावरांचा पाणीप्रश्न मात्र बिकट झाला आहे़ एक हजारच्या वर लोकवस्ती असलेल्या गारगोटवाडी गावात १९७३ च्या व १९९४ च्या वेळी दोन पाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या़ या योजना आता कुचकामी ठरल्या आहेत़ यामुळे येथे २००८ ला भारत निर्माणमधून २१ लाख ८० हजारांचा निधी प्राप्त झाला असल्याने तिसरी योजना राबविण्यात आली़ या तिसर्‍या योजनेच्या विहिरीचे पाणी मार्च महिन्यातच संपले असल्याने ग्रामस्थांनी मारोती बाबूराव खुपसे यांच्या शेजारील विहिरीवरून पाणी आणतात़ गारगोटवाडी येथील ग्रामस्थांना मी मार्च महिन्यापासून पाणी देतोय़ पण माझ्या विहिरीचे अधिग्रहण मात्र २९ एप्रिलपासून दाखविण्यात आले आहे़ सरपंच व ग्रामसेवकांनी ठराव उशिरा घेवून माझ्यावर अन्याय केला़ माझी पिकेही वाळून गेली -मारोती खुपसे, शेतकरी़ गारगोटवाडी गावालगत गत पाच वर्षांपूर्वी कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला़ पण यात एकदाही पाणी अडविण्याचा प्रयत्न झाला नाही़ या बंधार्‍यात पाणी अडवले गेले असते तर भारत निर्माणच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला पाणी कमी पडले नसते - भिकू चव्हाण, शंकर राठोड (ग्रामस्थ)़