शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ३८४६ मजूर उपस्थिती

By admin | Updated: December 15, 2015 23:32 IST

हिंगोली : जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर कोणत्याही परिस्थितीत न होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांची बैठक घेत सूचना दिल्या.

हिंगोली : जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर कोणत्याही परिस्थितीत न होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांची बैठक घेत सूचना दिल्या. तर नव्याने कामे सुरू करून मजूर उपस्थिती वाढण्यासाठी जागृती करण्यास सांगण्यात आले. सध्या ८0 कामांवर केवळ ३८४६ मजूर आहेत. जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या उपस्थितीतील या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, प्रभारी सीईओ विलास जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी पवार, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्यासह तहसीलदार, बीडीओ आदींची उपस्थिती होती. हिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोतील मजूर उपस्थिती मागील वर्षी दुष्काळ असतानाही कमी झाली होती. यंदाही तीच परिस्थिती असताना मजूर कामावर नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी कामे सुरू होत नसल्याची अडचण असली तरी बहुतांश ठिकाणी अपुऱ्या मजुरीमुळे मजूरच बाहेरगावी कामाला जाणे पसंत करीत आहेत. सध्या औंढ्यात १६ कामांवर ३४३, वसमतला ४ कामांवर ६५, हिंगोलीत २७ कामांवर २३७१, कळमनुरीत १२ कामांवर ३१४, सेनगावात २१ कामांवर ७५३ मजूर आहेत. जिल्ह्यात यापूर्वी मग्रारोहयोत सुरू करण्यात आलेल्या कामांपैकी सिंचनाच्या कामांना प्राधान्य देवून ही कामे पूर्ण करण्यासही बजावण्यात आले आहे. यामध्ये ९४७ सिंचन विहिरी तर १९0 शेततळे रखडलेले आहेत. येत्या महिनाभरात ही कामे पूर्ण होतील, असे नियोजन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. नवीन कामे उपलब्ध करून देण्यासाठी केवळ कागदोपत्री अहवाल न देता प्रत्यक्षात फिल्डवर जावून त्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. तर येत्या पंधरा दिवसांत या पद्धतीने नवीन कामे सुरू करून त्याचा अहवाल छायाचित्रासह सादर करण्यास सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)