शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाचे केवळ ११ टक्के वाटप

By admin | Updated: June 17, 2014 01:13 IST

उस्मानाबाद : अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची आता बँकांकडूनही पीक कर्ज वाटपाबात अडवणूक केली जात असल्याचे दिसत आहे.

उस्मानाबाद : मार्च, एप्रिल महिन्यात झालेल्या गारपीटीमुळे अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची आता बँकांकडूनही पीक कर्ज वाटपाबात अडवणूक केली जात असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील बँकांना खरीप पीक कर्ज वाटपासाठी ४८२ कोटींचे उद्दिष्ट दिलेले असताना बँकांनी मात्र आतापर्यंत केवळ ८४ कोटींचे पीक कर्ज वाटप केल्याचे समोर आले आहे. पीक कर्जाची ही टक्केवारी केवळ अकरा टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार बैठका घेऊन कर्ज वाटपाबाबत आदेश देऊनही बँकांनी या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून होत असलेला अपुरा पाऊस, त्यातच गेल्या दोन महिन्यांत झालेली गारपीट, वादळी वारे यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच यंदा चांगला पाऊस होऊन अपेक्षित उत्पन्न हातात पडेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. सद्यस्थितीत आंतरमशागतीची कामे पूर्ण झाली असून, पेरणीयोग्य पाऊस होताच शेतकऱ्यांची पेरण्यांची लगबग सुरू होणार आहे. परंतु, आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडे बी-बियाणे, खते खरेदीसाठीही पैसे नसल्याने कर्ज मिळविण्यासाठी बँकेचे उंबरठे झिजवित आहेत. परंतु, बँकांकडून मात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे. वास्तविक पैशाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबू नयेत, या उद्देशाने शासनाने जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी ४८२ कोटी ९४ लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. परंतु, बँकांनी मात्र जाणूनबुजून शेतकऱ्यांची अडवणूक करण्यास सुरुवात केल्याचे आजवर वाटप झालेल्या कर्जाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. (प्रतिनिधी)कारवाईकडे लक्षखरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची गय केली जाणार नाही. शासकीय विभागांनी त्या बँकांमध्ये केलेली गुंतवणूक काढून टाकू आणि जिल्ह्यातील अशा बँका काळ्या यादीत टाकून त्यांचा अहवाल रिझर्व्ह बँकांक़डे पाठविला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मे महिन्यात झालेल्या आढावा बैठकीवेळी दिला होता. तसेच बँकांची प्रगती पाहून त्यांचे रँकींग ठरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांच्या हा इशाराही बँकांनी गांभिर्याने घेतलेला दिसत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी आता या बँकांवर काय कारवाई करतात, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.