एकाचा जन्मदिवस ठरला दुसऱ्याचा मृत्यूदिन; पार्टीत नाचताना धक्का लागल्याने तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 16:28 IST2022-12-29T16:28:03+5:302022-12-29T16:28:48+5:30

आरोपी आणि मृत जवळचे नातेवाईक आहेत.

One's birthday is another's death day; A young man was killed after being shocked while dancing at a party | एकाचा जन्मदिवस ठरला दुसऱ्याचा मृत्यूदिन; पार्टीत नाचताना धक्का लागल्याने तरुणाचा खून

एकाचा जन्मदिवस ठरला दुसऱ्याचा मृत्यूदिन; पार्टीत नाचताना धक्का लागल्याने तरुणाचा खून

औरंगाबाद: नात्यातील मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत नाचताना धक्का लागल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. सय्यद माजिद सय्यद पाशा (३५ , रा.गल्ली क्र-६,  किराडपुरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, माजीद सय्यद पाशा आणि आरोपी जवळचे नातेवाईक आहेत. बुधवारी रात्री किराडपुरा येथे एका पाच वर्षीय चिमुकल्याचा वाढदिवस होता. यानिमित्ताने आयोजित पार्टीत सर्व नातेवाईक एकत्र आले होते. वाढदिवसाचा केक कापल्यावर नाचगाणे सुरु असताना माजीदचा धक्का आरोपींना लागला. यावरून माजीद सोबत त्यांचा वाद सुरु झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. 

यावेळी उपस्थित नातेवाईकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला . मात्र, काही वेळाने आरोपी हत्यार घेऊन परत आले. त्यांनी अचानक माजीद आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर जोरदार हल्ला केला. यात माजीद आणि इतर नातेवाईक गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.

दरम्यान, माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून माजिद सय्यद पाशा यास मृत घोषित केले. तर आणखी तिघांवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती असून इतरांचा शोध सुरु आहे.

Web Title: One's birthday is another's death day; A young man was killed after being shocked while dancing at a party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.