औरंगाबादमध्ये एसटी महामंडळाच्या बसने महिलेला चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 15:12 IST2018-11-03T15:12:40+5:302018-11-03T15:12:59+5:30
सिडको बस स्टँड चौकाकडून मुकुंदवाडीकडे वळत असताना मागून सुसाट आलेल्या एस टी महामंडळाच्या बसने एका महिलेला चिरडल्याची घटना समोर आली आहे.

औरंगाबादमध्ये एसटी महामंडळाच्या बसने महिलेला चिरडले
औरंगाबाद - सिडको बस स्टँड चौकाकडून मुकुंदवाडीकडे वळत असताना मागून सुसाट आलेल्या एसटी महामंडळाच्या बसने एका महिलेला चिरडल्याची घटना समोर आली आहे. मोहिनी प्रितेश कुलकर्णी (24) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी दुपारी बारा सुमारास मोपेडने एपीआय कॉनरचौकातील रुग्णालयात जात होत्या. सिडको उड्डाणपूलाखाली त्या असताना मागून सुसाट वळण घेत मुकुंदवाडीकडे निघालेल्या एसटी बसने त्याना जोराची धडक दिली. या घटनेत मोहिनी या बसच्या पुढील आणि मागच्या चाकाखाली आल्याने घटनास्थळीच त्यांचाय मृत्यू झाला. अपघातनंतर बसचालक बससह पळून गेला. पोलिसांनी पाठलाग करून मुकुंदवाडी ठाण्यालगत बस पकडली. तसेच एम आय डी सी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.