शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

तिहेरी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:26 IST

एक गंभीर जखमी : वाहतूक विस्कळीत; औरंगाबाद -नगर महामार्गावरील दुर्घटना

लिंबेजळगाव : औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील लवकीच्या ओढ्याजवळ ट्रॅक्टर, ट्रक व टेम्पो तीन वाहनांच्या विचित्र अपघातात टेम्पोमधील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडला. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.रवीपाल नरेनपाल (५०, रा.दाजीर्लिंग, ह.मु चिखली, जि.बुलडाणा) असे अपघातात मयत झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तर गोरख लक्ष्मण खसुरे (४४, रा. हडपसर, पुणे) असे जखमीचे नाव आहे.उसाने भरलेला ट्रॅक्टर नेवाशाकडून औरंगाबादकडे येत असताना नादुरुस्त झाल्याने लिंबेजळगावजवळील लवकीच्या ओढ्याजवळ चालकाने उभा केला होता. घोडेगाव येथून मध्यप्रदेशकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक (एपी -१६ -टी व्ही १८३६) हा उभ्या असलेल्या या ट्रॅक्टरला येऊन धडकला. दरम्यान, याचवेळी पुणे येथून चिखलीकडे रोपवाटिकेचे झाडे घेऊन येणारा टेम्पो (एमएच -०४ -एफजे -२३०१) हा पाठीमागून या ट्रकवर आदळला. या भीषण अपघातात ट्रॅक्टर उसाच्या ट्रॉलीसह उलटले व त्यातील ऊस रस्त्यावर पडला. टेम्पोचा पुढील भाग ट्रकच्या पाठीमागील भागास धडकल्याने टेम्पोमध्ये बसलेले व्यापारी रविपाल यांचा जागीच मृत्यू झाला तर गोरख खसुरे हे जखमी झाले. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वाळूजचे पो.नि. सतीशकुमार टाक, उपनिरीक्षक सागरसिंग राजपूत, पो.हे.कॉ. नामदेव मालोदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, ट्रॅक्टरचा चालक घटनास्थळाहून पसार झाला असून या प्रकरणाची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.हा अपघात एवढा भीषण होता की, जवळील टोलनाका व आजूबाजूच्या परिसरात मोठा आवाज झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन तब्बल दीड कि.मी.वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यातील अनेक वाहनचालक विरूध्द दिशेने वाहन चालवत होते. पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली.क्रेनच्या साह्याने ट्रॅक्टरचा समोरील भाग बाहेर काढून तो उभा करताना पोलिसांना कसरत करावी लागली.असाच एक अपघात काही दिवसांपूर्वी ऊसाचा ट्रॅक्टर खराब झाल्याने २० नंबर खोलीजवळ छोटाहत्ती धडकून एक जखमी झाला होता.महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलेवाळूज ते लोखंडी पूल या मार्गावर सतत अपघाताची मालिका सुरुच असल्याने वाळूज पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या महामार्गावरशिवराई फाटा, लिंबेजळगाव लवकीच्या ओढ्याजवळ, लिंबेजळगाव बसस्थानकलगत, म्हसोबा परिसर, जिकठाण फाटा, रहीमपूर फाटा कॉर्नर, २० नंबर खोलीजवळ, दहेगावबंगला, इसारवाडी फाटा व लोखंडी पूल ही प्रसिद्ध अपघातस्थळे आहेत. या ठिकाणी अनेकांचा जीव जाऊन काहींना अपंगत्व आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस