शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेणाऱ्या वाहतूकपोलिसासह एकास अटक

By admin | Updated: September 8, 2014 00:35 IST

वाळूज महानगर : धरलेल्या गाडीची कागदपत्रे परत देण्यासाठी ८०० रुपयांची लाच घेणाऱ्या ट्रॅफिक पोलिसासह एकस अटक केली.

वाळूज महानगर : धरलेल्या गाडीची कागदपत्रे परत देण्यासाठी ८०० रुपयांची लाच घेणाऱ्या ट्रॅफिक पोलिसासह एक ा जणास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज दुपारी रंगेहाथ अटक केली.तक्रारदार दि.६ सप्टेंबर रोजी आपल्या मोटारसायकलवर वाळूज येथून औरंगाबादकडे एसबीआय बँकेत चलान भरण्यासाठी जात असताना वाहतूक पोलीस सुनील अंबादास चव्हाण (३३, रा. मिरजगावे नगरी, बीड बायपास) याने ए.एस. क्लबजवळ मोटारसायकल अडवून चावी काढून घेतली. त्यानंतर गाडीची मूळ कागदपत्रे व लायसन्स घेतले आणि पावती भरण्यास सांगितले. तक्रारदाराने पावती भरतो, तुम्ही गाडीची कागदपत्रे व लायसन्स द्या, अशी चव्हाण याच्याकडे मागणी केली असता चव्हाण याने १,१०० रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोड होऊन १ हजार देण्याचे ठरले. चव्हाण याने २०० रुपये रोख घेऊन बाकीचे ८०० रुपये दुसऱ्या दिवशी देण्यास सांगितले. तक्रारदाराने सुनील चव्हाण यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जाऊन लाच मागितल्याची तक्रार केली.लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर येथील ओअ‍ॅसिस चौकात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार आज दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ८०० रुपये देण्यासाठी ओअ‍ॅसिस चौक येथे आला. चव्हाण याने ही रक्कम त्याचा ‘पंटर’ नितेश भिकाजी खोतकर (२३, रा. साईनगर, पंढरपूर) याच्यामार्फत स्वीकारताना पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. डी.एम. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किशोर पवार, कर्मचारी सुधाकर मोहिते, श्रीराम नांदुरे, कैलास कामठे, सचिन शिंदे, अश्वलिंग होनसव व चालक इंगळे यांनी केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.