शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटीचे ‘ट्रॉमा केअर’ उद्घाटनाअभावी धुळखात

By admin | Updated: August 18, 2014 00:33 IST

तब्बल दीड कोटी रुपये खर्चून मालेगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले़ मात्र केवळ उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण झाली नसल्याने अपघातग्रस्तांना उपचारासाठी अन्यत्र जावे लागत आहे़

शरद वाघमारे, मालेगावराष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा मोठा राबता असतो़ एखादा अपघात घडल्यास जखमींवर तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, या हेतुने तब्बल दीड कोटी रुपये खर्चून मालेगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले़ मात्र केवळ उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण झाली नसल्याने अपघातग्रस्तांना उपचारासाठी अन्यत्र जावे लागत आहे़राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ कल्याण-निर्मल या मार्गावर मालेगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर मिळवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करुन दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला़ यातून सुसज्ज आॅपरेशन थियटरसह २० खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले़ युनिटमध्ये पाच विशेष तज्ज्ञ, निवासी वैद्यकीय अधिकारी, दोन शस्त्रक्रिया विभाग, बाह्यरुग्ण विभाग, क्ष-किरण आदी यंत्रणेला मंजूरी मिळाली़ जिल्ह्याला तेलंगना राज्याची सिमा लागून आहे़ मध्यवर्ती ठिकाण असल्याने सभोवतालच्या जिल्ह्यातील वाहनांचा विविध कामांसाठी नांदेडला मोठा राबता असतो़ शिवाय नागपूर, आदिलाबाद, औरंगाबाद,निजामाबाद, परभणी, हिंगोली, लातूर या मार्गावरुन सामानाची वाहतूक करणारी जड वाहने या मार्गाचा अवलंब करतात़ एखादा अपघात घडला तर मदतीसाठी वसमत फाटा येथे महामार्ग पोलिसांचे पथक अ‍ॅम्बुलंन्ससह कार्यान्वित आहे़ मात्र जखमींना उपचारादाखल करावयाचे झाल्यास नांदेडला आणण्याशिवाय पर्याय नाही़ किमान २० किमीचे अंतर पार करुन रुग्णालयात दाखल होईपर्यंत गंभीर जखमीवर मृत्यू वाटेतच ओढावतो़ मालेगाव येथे बांधण्यात आलेल्या ट्रॉमा युनिटलगतच गतवर्षी ट्रक, जीप, आॅटोच्या तिहेरी अपघातात १४ जण ठार झाले होते़ हे उदाहरण प्रतिनिधीक स्वरुपाचे असून असे अनेक लहानमोठे अपघात नित्यानेच घडतात़ अपघातातील जखमींना त्वरीत वैद्यकीय उपचार मिळाल्यास जीवीत हानी होण्याचे प्रमाण टळू शकते़ हीच बाब हेरुन मालेगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर झाले़ मात्र केवळ उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण झाली नसल्याने याचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना मिळेनासा झाला आहे़ विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी या ट्रॉमा युनिटचे उद्घाटन झाल्यास अपघातातील जखमींना मोठा दिलासा मिळणार आहे़