शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचार्‍यांनो आपत्ती काळात तरी मुख्यालयी रहा़़़

By admin | Updated: May 9, 2014 00:30 IST

अनुराग पोवळे , नांदेड शासकीय कर्मचार्‍यांनी मुख्यालयी रहावे असा नियम असला तरी त्या नियमाचे कितपत पालन होते हे उघड गुपीत आहे़

 अनुराग पोवळे , नांदेड शासकीय कर्मचार्‍यांनी मुख्यालयी रहावे असा नियम असला तरी त्या नियमाचे कितपत पालन होते हे उघड गुपीत आहे़ याच गुपीताच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचार्‍यांना किमान पावसाळ्यात तरी मुख्यालयी रहावे असा सूचना वजा आदेश बजावला आहे़ जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने आगामी मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक बुधवारी संध्याकाळी बचत भवनमध्ये घेण्यात आली़ या बैठकीत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शासकीय यंत्रणेला किमान आपत्तीकाळात तरी सजग राहण्याची गरज असल्याचे कानपिचक्या देत सांगितले़ आपत्तीकाळात उपयुक्त ठरणार्‍या साहित्याचा आढावा घेताना जिल्हाधिकार्‍यांनी उपलब्ध साहित्य कुठे आहे याचा अधिकार्‍यांनी शोध घ्यावा असा उपहासात्मक सल्लाही यंत्रणेला दिला़ हा सल्ला गतवर्षी आपत्तीकाळात निर्माण झालेल्या परिस्थितीतूनच त्यांनी दिला़ आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध झालेले लाखो रूपयांचे साहित्य आज उघड्यावर, कुठेतरी कोपर्‍यात पडलेले असते ही अनुभवण्यास आलेली बाबही त्यांनी बैठकीत सांगितली़ तलाठी, ग्रामसेवकांनाही धारेवर धरताना जिल्हाधिकार्‍यांनी चार - चार दिवस या संवर्गातील कर्मचारी सापडत नसल्याचे सांगितले़ परिणामी नागरिकांना अडचणी निर्माण होतात़ ही बाब कर्मचार्‍यांपुरतीच मर्यादित न ठेवता जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारीही मुख्यालयी राहणे गरजेचे असल्याचे सांगितले़ आपत्तीकाळात घ्यावयाच्या सर्व निर्णयांची जबाबदारी तहसीलदारांवर असते, तेच नसतील तर मग निर्णय कोण घेणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ मुख्यालयी कुणीच राहत नसल्याची बाब गंभीरतेने घेताना धीरजकुमार यांनी यावर तोडगा काय काढता येईल असा प्रश्न या बैठकीत उपस्थित अधिकारी-कर्मचार्‍यांना केला़ मुख्यालयी राहण्याबाबत दंडात्मक कारवाईचा पर्यायही खुला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ मान्सूनकाळात येणार्‍या आपत्तीनिवारणासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची सूचना देताना लोकसभा निवडणूक काळात स्थापन करण्यात आलेल्या तालुकास्तरावरील नियंत्रण कक्षांची अवस्था चांगली नव्हती़ या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी कुणी उचलायला तयार नव्हते़ आपत्तीकाळात तरी अशी परिस्थिती राहू देवू नका असेही धीरजकुमार यांनी सुनावले़ याबाबतची जबाबदारी तहसीलदार आणि त्यानंतर संबंधित उपविभागीय अधिकार्‍यांवर राहिल असेही स्पष्ट करण्यात आले़ नुकसानीच्या पंचनाम्याबाबत तक्रारी येवू देवू नका असा सल्लाही त्यांनी दिला़ यासाठी छायाचित्र, छायाचित्रण करण्याची सूचनाही त्यांनी दिली़ प्रकल्पांचे पाणी सोडताना सर्व विभागांचा समन्वय राहणे आवश्यक आहे़ आपत्ती व्यवस्थापन निवारणाच्या पूर्व तयारीच्या बैठकीत खुद्द जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनीच शासकीय यंत्रणेतील कर्मचार्‍यांपासून ते अधिकार्‍यांच्या कार्यपध्दतीचे वर्णन हे आगामी काळात तरी बदलण्याची गरज निश्चितच आहे़ मुख्यालयी राहण्यासाठी शासनाकडून घरभाडे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी यासाठी शासन कर्मचार्‍यांना घरभाडे देते़ कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची ओरड होताच कधी -कधी प्रशासनाकडून कारवाई करताना संबंधितांना नोटीस बजावली जाते़ तसेच यापुढे मुख्यालयी राहण्याचे हमीपत्र घेवून घरभाडे अदा केले जाते़ अधिकार्‍यांनाही हाच नियम आहे़ शासनाकडून दिले जाणारे हे घर भाडे सर्वच कर्मचारी, अधिकारी घेत असतात़ मात्र मुख्यालयी किती जण राहतात हा संशोधनाचा विषय आहे़