शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी विरूध्द पदाधिकारी वाद रंगणार

By admin | Updated: June 22, 2015 00:19 IST

! कळंब : पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शांता सूर्यवाड यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामांबाबत कडक धोरण अवलंबिले आहे.

!कळंब : पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शांता सूर्यवाड यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामांबाबत कडक धोरण अवलंबिले आहे. रोजगार हमी योजनेची कामांची पहाणी करण्यासाठी विशेष पथकाची स्थापनाही करण्यात आली आहे. त्यामुळे कुठल्याही कामाची बिले काढण्यासाठी सदरील पथकाचा अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे रोहयो लॉबीची चांगलीच गोची झाली आहे. असे असतानाच आता काही पदाधिकाऱ्यांनी बीडीओंच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत थेट विभागीय आयुक्तांकडे १८ जून रोजी तक्रार केली आहे. सिमेंट नाला बांधाचे समप्रमाणात वाटप झाले नाही, हजेरी पत्रकाबाबत माहिती दिली जात नाही, मजुरांची मजुरी विलंबाने दिली जाते, अशा अनेक बाबी त्यात विषद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात अधिकारी विरूद्ध पदाधिकारी असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. कळंब पंचायत समिती स्तरावर करण्यात आलेल्या मग्रारोहयो कामांची चर्चा विविध कारणांमुळे नेहमीच समोर येत असते. या कार्यालयांतर्गत करण्यात आलेल्या मग्रारोहयो कामांमुळे तत्कालीन बीडीओ तसेच जि. प. चे अभियंते, ग्रामसेवक अडचणीत आले आहेत. गावपुढाऱ्यांच्या दबावामुळे तसेच टक्केवारीच्या हव्यासापोटीही अनेक कामे न करताही त्याचे पैसे उचलल्याचे प्रकार पंचायत समितीत समोर आले आहेत. मग्रारोहयो अंतर्गत करण्यात येणारे विहिरी तसेच इतर वैयक्तिक लाभाच्या कामांमध्येही बऱ्याच अनियमितता होत्या. या तक्रारींची दखल घेऊन गटविकास अधिकारी सुरेवाड यांनी मग्रारोहयो तसेच पंचायत समिती अंतर्गत होणार इतर कामांबाबतही कडक धोरण अवलंबिले आहे. मग्रारोहयो कामांसाठी तर विशेष पाहणी पथक नेमून कामांची तपासणी करूनच देयके दिले जात आहेत. यामुळे फक्त कागदावरच कामे दाखवून मलिदा लाटणाऱ्या गावपुढाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. मग्रारोहयोचे काम बंद असेल व त्या कामांचा अहवाल संबंधित यंत्रणेने सरु असल्याचे दिसला असल्यास अशा कामंना ‘झिरो’ करून टाकण्याची किमया सुरेवाड यांनी दाखविल्याने पंचायत समितीत वावरणाऱ्या खाबुगिरी पुढाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. पंचाय समिती प्र्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने आता सुरेवाड यांना ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. (वार्ताहर)तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत सिमेंट नाला बांधाची कामे सुरू असल्याचा अहवाल यंत्रणेमार्फत दिला जातो. परंतु, ती कामे प्रत्यक्ष सुरू नसताना किंवा यंत्राद्वारे केली जातात. अशाच प्रकार खामसवाडी शिवारातील एका कामचा अहवाल गावपुढाऱ्याने सादर केला होता. परंतु, ते कामच चालू नसल्याची लेखी माहिती प्राप्त झाल्यानंतर बीडीओंनी हजेरीपत्रकच नामंजूर केले. या हजेरीपत्रकावर संबंधितांच्या सह्याही बनावट असल्याची चर्चा होती.कळंब पंचायत समितीअंतर्गत सुरू असलेली मग्रारोहयो तसेच इतर कामेही नियमानुसारच होणार आहेत. यासाठी विशेष तपासणी पथक नियुक्त करण्यात आले असून, त्यांचा अहवाल घेऊन तसेच प्रत्यक्ष पाहणी करूनच निर्णय घेतला जाणार आहे. पं. स. मध्ये कामांच्या मंजुरीसाठी तसेच इतर कामांसाठी कोणी पैशांची मागणी करीत असेल तर त्याची माहिती थेट आपल्याकडे द्यावी. संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. कोणी दबाव आणून नियमबाह्य कामे करण्यासाठी आग्रह धरीत असेल तर तो दबाव सहन केला जाणार नाही, असे गटविकास अधिकारी सुरेवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत सिमेंट नाला बांध मंजूर करण्यासाठी पंचायत समितीत २५ हजार रुपये द्यावे लागत असल्याची चर्चा पं. स. वर्तुळात आहे. पं. स. मधील प्रत्येक टेबल फिरवून प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत २५ हजारांचा आकडा गाठला जात असल्याचे काही कंत्राटदारांचे म्हणणे आहे. गटविकास अधिकारी सुरेवाड या रजेवर असताना मोठ्या प्रमाणात ‘सिनाबां’ कामांना मंजुरी दिल्याची माहिती हाती आली आहे.