अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट; सीए पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 07:44 IST2023-07-02T07:44:06+5:302023-07-02T07:44:45+5:30

भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर कारवाई

Offensive comments on Amruta Fadnavis tweet; One person in police custody | अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट; सीए पोलिसांच्या ताब्यात

अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट; सीए पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, प्रसिद्ध बँकर्स अमृता फडणवीस यांच्या सोशल मीडियातील  ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट करणे शहरातील ‘सीए’ला चांगलेच महागात पडले. भाजप पदाधिकाऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी सूत्रे हलवत काही तासांत सीएला ताब्यात घेतले. अतिष ओमप्रकाश काबरा असे आरोपीचे नाव आहे.

अमृता फडणवीस सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफार्मवर सक्रिय असतात. त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्यादेखील लाखांमध्ये आहे. अनेक घटना, घडामोडी, सण आदींवर त्या व्यक्त होत असतात. माध्यमांमध्ये त्यांच्या अनेक पोस्टची दखल घेतली जाते. त्यांच्या एका ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट करणे शहरातील ‘सीए’ ला थेट पोलिस ठाण्यात घेऊन गेल्याचा प्रकार  समोर आला.

अमृता फडणवीस यांच्या ट्विटर पोस्टवर अतिषने ३० जून रोजी आक्षेपार्ह कमेंट केली. भाजप पदाधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांना  कळवले. त्यांनी ही बाब सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांना सांगितली. त्यांनी अतिषच्या प्रोफाइलवरून त्याचा शोध सुरू करत लागलीच ताब्यात घेतले. पालोदकर यांच्या फिर्यादीवरून अतिषवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Offensive comments on Amruta Fadnavis tweet; One person in police custody