शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली १२०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:04 IST

१७ जणांचा मृत्यू, तर ८३० जणांवर उपचार सुरू

ठळक मुद्देदिवसभरात ८३ रुग्णांची भर बजाजनगर येथे ३९ रुग्णांची भर

औरंगाबाद : शहरामध्ये वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत बरोबरीने ग्रामीण भागातील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी दिवसभरात नव्याने ८३ रुग्णांची भर पडल्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या १२०० वर पोहोचली, तर १७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, ८३० जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वेगाने प्रसार मागील १५ दिवसांपासून होत आहे. यात बजाजनगर, पंढरपूर, वाळूज या औद्योगिक  वसाहतीमधील बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्याच वेळी वैजापूर, गंगापूर, कन्नड, पैठण आदी तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. बुधवारी ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा बाराशेवर पोहोचला. सायंकाळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार दिवसभरात औरंगाबाद तालुका ४२, गंगापूर ११, कन्नड ५, वैजापूर १८, फुलंब्री १, खुलताबाद ५,  सिल्लोड १   आणि पैठण तालुक्यात २ कोरोनाबाधितांची वाढ झाली. एकूण ८३ रुग्णांमुळे ग्रामीण भागातील आकडा १२०० वर पोहोचला. आता  ग्रामीण भागात एकूण ८३० रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तर ३५३ रुग्णांना कोरोनामुक्तीनंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गंडाळ यांनी  स्पष्ट केले.

बजाजनगर येथे ३९ रुग्णांची भरबजाजनगर परिसरात बुधवारी ३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळून आले. तरीही मागील काही दिवसांतील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी पाहता दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत अल्पशा फरकाने का होईना; पण घट दिसून येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बजाजनगर परिसरात महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी भरमसाठ वाढ चिंताजनक ठरत आहे. लॉकडाऊनदरम्यान या परिसरात बोटावर मोजण्याइतकेच कोरोनाचे रुग्ण होते. त्यानंतर मात्र वेगाने  पसरत चाललेल्या कोरोनाच्या संसर्गाने उद्योगनगरीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायती, एमआयडीसी व सिडको प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या परिसरात मंगळवारी ३४ तर बुधवारी ३९ कोरोनाबाधित आढळून आले. बुधवारी १३५ नागरिकांचे स्वॅब घेतल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे यांनी सांगितले. 

कुंभेफळ येथील आणखी ६ पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या १० वरकुंभेफळ येथे स्कोडा कंपनीच्या कामगारासह ३ जण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणखी ६ जणांचे नमुने बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कुंभेफळची एकूण रुग्णसंख्या १० वर गेली आहे. या सहामध्ये एका खाजगी डॉक्टरचा समावेश आहे. कुंभेफळ येथे १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर मंगळवारी (दि.३० जून) येथील रहिवासी व स्कोडा कंपनीतील एक कामगार व आणखी दोघे, असे एकूण ३ पुन्हा पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे त्यांच्या परिवारातील व संपर्कातील एकूण ६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून जालनारोड व गावातील दुकान एक दिवसाआड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुधीर मुळे यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद