शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

आता सोमवारपर्यंत जालन्याचा पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: November 6, 2014 01:34 IST

जालना : जायकवाडी - जालना योजनेचा पाणीपुरवठा मंगळवारपासून नियमित देखभाल व दुरूस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी या योजनेतून शहरासाठी पाणी घेणे बंद आहे

जालना : जायकवाडी - जालना योजनेचा पाणीपुरवठा मंगळवारपासून नियमित देखभाल व दुरूस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी या योजनेतून शहरासाठी पाणी घेणे बंद आहे. त्यामुळे शहरात सोमवारी (ता. १०) पर्यंत पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांनी दिली.जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेसाठी इंदेवाडी येथील एअरवॉल नादुरूस्त आहे. तसेच तेथील जलकुंभाजवळील बटरप्लायवॉल नवीन बसविण्याचेही काम बाकी आहे. शिवाय एक जलवाहिनीही अंथरली जाणार आहे. देखभाल दुरूस्तीअंतर्गत हे काम आताच करणे आवश्यक आहे. कारण आगामी काळात टंचाई निर्माण होऊ नये, त्याचप्रमाणे उन्हाळ्यात अशा तांत्रिक कामांमध्ये अधिक वेळ जाऊ नये, यासाठी हे काम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. देखभाल दुरूस्तीच्या कामामुळे मंगळवारपासून जायकवाडी जलाशयातून पाणी घेणे बंद करण्यात आले आहे. दुरूस्तीचे काम तीन दिवस चालणार असून त्यानंतर पाणी घेऊन त्याचा पुरवठा करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सोमवारनंतरच शहरात नियमित पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता आर.यू. बगळे यांनी दिली. दरम्यान, दुरूस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून नागरिकांनी ही तांत्रिक अडचण लक्षात घेऊन नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)