शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आता पोलिसांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर नोंदवा तक्रार

By admin | Updated: February 10, 2016 00:17 IST

लातूर : लातूर पोलिसांचे काम चांगले आहे. पोलिसांनी लावलेल्या तपासामुळे मिळालेल्या शिक्षेचे प्रमाण २०१३ पासून दरवर्षी वाढलेले दिसले.

लातूर : लातूर पोलिसांचे काम चांगले आहे. पोलिसांनी लावलेल्या तपासामुळे मिळालेल्या शिक्षेचे प्रमाण २०१३ पासून दरवर्षी वाढलेले दिसले. सोनसाखळीचोर, चोऱ्या आणि दरोड्याच्या गुन्ह्याचे तपास आणि पोलिस ठाण्यातील दप्तरी लेखाजोखा पाहता लातूरच्या पोलिसांचे काम चांगले वाटले. पोलिस आणि नागरिक यांच्यातील सलोखा वाढविण्याच्या मोहिमेला आता लातूरचे पोलीस निश्चित गती देऊन काम करणार असून पोलिसांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर सुद्धा नागरिक थेट तक्रारी नोंदवू शकतील, असे नांदेड परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. लातूर जिल्ह्याच्या पहिल्या भेटीत पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लातूर पोलिसांनी बँकेमध्ये गॅस कटर घेऊन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी पकडली. दुचाकी चोरीच्या टोळ्या पकडल्या. सोनसाखळी चोरांची टोळी पकडली. दरोड्यांच्या गुन्ह्यातील चोरांना जेरबंद केले. अशा गुन्हे उकलण्याचे प्रमाण जिल्ह्यात निश्चित समाधानकारक आहे. त्याहीपेक्षा पोलिसांनी केलेल्या तपासावर गुन्हेगारांना मिळणाऱ्या शिक्षेचे प्रमाण गेल्या तीन वर्षात चढत्या आलेखावर आहे. यावरुनच पोलिसांची कर्तव्यदक्षता दिसून येते. पोलिस ठाण्यातील दप्तरी नोंदी चांगल्या आहेत. काही उणीवाही दिसून आल्या. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न मुख्य आहे. नागरिकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यात पोलिस यंत्रणा अपुऱ्या मनुष्यबळामुळे कमी पडते आहे. आमच्या पोलिस महासंचालकांनी पोलिसांना नागरिकांत मिसळण्याचे आवाहन केले आहे. या कार्यप्रणालीत पोलिस शाळा - कॉलेजमध्ये जाऊन मुले-मुली आणि शिक्षकांशी संवाद साधतील. विविध मोहल्ल्यांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधतील. यासाठी पोलिस मित्रांची विशेषत: जास्त मदत घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.