आता मनपा आयुक्तांचा कॅनडा दौरां

By Admin | Updated: July 28, 2015 01:18 IST2015-07-28T00:42:35+5:302015-07-28T01:18:16+5:30

औरंगाबाद : मनपा अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या सुरत आणि हैदराबाद दौऱ्यानंतर आता स्वत: आयुक्त प्रकाश महाजन आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे

Now the Municipal Commissioner's Canada tours | आता मनपा आयुक्तांचा कॅनडा दौरां

आता मनपा आयुक्तांचा कॅनडा दौरां


औरंगाबाद : मनपा अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या सुरत आणि हैदराबाद दौऱ्यानंतर आता स्वत: आयुक्त प्रकाश महाजन आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे हे कॅनडाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचा खर्च होणार आहे. या खर्चास मंजुरी घेण्यासाठीचा प्रस्ताव उद्या मंगळवारी स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे.
नियोजित दौऱ्यानुसार आयुक्त महाजन आणि नाईकवाडे हे कॅनडातील गुलेफ विद्यापीठात १८ ते २१ आॅगस्टदरम्यान भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत ते गोवंश हत्याबंदी विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी डीएनए बार कोडिंग तंत्राचा वापर व उपयुक्तता या विषयावर शोधनिबंध सादर करणार आहेत. मनपाच्या प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचे डीएनए बार कोडिंग करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हर्बट सेंटर आणि औरंगाबाद महानगरपालिका यांच्यात ९ मे २००५ रोजी सामंजस्य करार करण्यात आला होता. या केंद्रामार्फत प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचे अनुवंशिक आजार, जैव विविधता, मनपा हद्दीतील गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याचे अनुपालन इ. बाबतीत डीएनए बार कोडिंगच्या माध्यमातून संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनाला अनुसरून आयुक्त महाजन आणि नाईकवाडे यांनी आपला शोधनिबंध तयार केला आहे. या दौऱ्यावर प्रत्येकी १ लाख १५ हजार रुपये खर्च येणार आहे. हा खर्च मनपाच्या तिजोरीतून करण्यास मंजुरी मागणारा ठराव प्रशासनाने तयार केला असून, तो २८ जुलै रोजी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Now the Municipal Commissioner's Canada tours