शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

आता लातूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे लक्ष

By admin | Updated: October 28, 2014 00:59 IST

आशपाक पठाण , लातूर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच दिवाळी अन् निवडणुकीच्या विजयाचे फटाके फुटले.

आशपाक पठाण , लातूरविधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच दिवाळी अन् निवडणुकीच्या विजयाचे फटाके फुटले. आता दिवाळी सणाचा उत्साह ओसरत चालला आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरांची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेचा नवा महापौर कोण? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे बहुमत असलेल्या महापालिकेत १३ नगरसेवक ओबीसी प्रवर्गातून निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याविषयी चर्चा रंगल्या आहेत.लातूर शहर महानगरपालिकेतील महापौर स्मिता खानापुरे व उपमहापौर सुरेश पवार यांचा कार्यकाल २० नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे नव्या महापौर व उपमहापौरांची निवड २० नोव्हेंबरच्या अगोदर किंवा पुढील दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीअगोदरच महापौरांचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे विधानसभेपूर्वी लातूरच्या महापौर पदाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. लातूर शहर महापालिकेत काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. ७० पैकी ५० नगरसेवक काँग्रेसचे आहेत. मनपाची बहुतांश सूत्रे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याच हाती आहेत. त्यांच्याकडूनच महापौर व उपमहापौर दोन्ही पदांच्या नावावर शिक्कामोर्तब होतील. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात माजी मंत्री अमित देशमुख यांनी ओबीसी नगरसेवकांमध्ये मताधिक्यांची स्पर्धा लावली होती. ज्या प्रभागातून काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्य मिळेल, त्या प्रभागातील ओबीसी नगरसेवकाचा महापौर पदासाठी विचार होईल, अशी शक्यता वर्तविली होती. त्यामुळे इच्छुक नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रात्रीचा दिवस करून आपलाच प्रभाग कसा काँग्रेसला प्लस राहील, यासाठी धावपळ केली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच प्रभागनिहाय मतांची चर्चाही रंगली आहे. फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅपवर प्रभागनिहाय मताधिक्यांची आकडेवारी आता फिरू लागली आहे. दिवाळीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री अमित देशमुख यांच्या विजयाचे फटाके फुटल्यावर आता चर्चा रंगली आहे ती लातूरच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार?