शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

आता आशा वर्कर करणार समुपदेशन

By admin | Updated: December 16, 2015 23:14 IST

इलियास शेख, कळमनुरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आता गावातील आशा वर्कर शेतकऱ्यांना समुपदेशन करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र कत्रुवार यांनी दिली

इलियास शेख, कळमनुरी प्रेरणा प्रकल्प शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आता गावातील आशा वर्कर शेतकऱ्यांना समुपदेशन करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र कत्रुवार यांनी दिली. सततची नापिकी होत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्या रोखण्यासाठी आता आरोग्य विभाग सरसावला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा रोखाव्यात याबाबत तालुक्यातील १९५ आशा वर्करला तालुकास्तरावर २८ व ३० नोव्हेंबर रोजी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक आशा वर्कर त्यांच्या गावातील शेतकऱ्यांचा सर्वे करत आहेत. प्रत्येक आशा वर्करला सर्वेसाठी २५० घरे दिली आहेत. शेतकरी कोणत्या कारणाने आत्महत्या करीत आहे, त्याची कारणे शोधणार आहेत. त्यात नापिकी, व्यसन, गंभीर आजार, मुला-मुलींचे लग्न आदी कारणे राहणार आहेत. शेतकऱ्यांना नैराश्य कशामुळे आले, याची कारणे आशा वर्कर शोधून काढणार आहेत. नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन, गंभीर कारण असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे समुपदेशनासाठी संदर्भित करण्यात येणार आहे. सौम्य नैराश्य असेल तर आशा वर्करच समुपदेशन करणार आहेत. मध्यम नैराश्य असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. मात्र तीव्र नैराश्य असेल तर जिल्हा आरोग्य कार्यालयाकडे पाठविल्या जाणार आहे. शेतकऱ्यांचे समुपदेशन करायचे असेल तर टोल फ्री क्रमांक १०४ उपलब्ध करुन दिला आहे. तेथून थेट मानसोपचार तज्ज्ञांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जाणार आहे.