शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

आता कर्मचार्‍यांच्या ‘टीडीएस’वर डल्ला?

By admin | Updated: May 28, 2014 01:13 IST

औरंगाबाद : शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या टीडीएसवर डल्ला मारल्याचे प्रकरण ताजे असतानाच आस्थापनेवरील १,६०० कर्मचार्‍यांच्या टीडीएस कपातीबाबतही असाच प्रकार घडल्याची शंका प्रशासनाला आहे.

औरंगाबाद : महापालिकेने शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या टीडीएसवर डल्ला मारल्याचे प्रकरण ताजे असतानाच आस्थापनेवरील १,६०० कर्मचार्‍यांच्या टीडीएस कपातीबाबतही असाच प्रकार घडल्याची शंका प्रशासनाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या प्रकरणी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. ३१ मार्चपर्यंत मनपाने सर्व कर्मचार्‍यांचा टीडीएस भरणा केला आहे. गेल्या वर्षीच्या टीडीएसमध्ये ही हेराफेरी करण्यात आली आहे. शिक्षकांच्या वेतनातून टीडीएस कपात केला. मात्र, आयकर विभागाला ती रक्कम न भरता आठ महिने कंत्राटदारांची बिले देण्यासाठी बिनधास्त वापरल्याने शिक्षण विभागाला ५ लाख ५४ हजार रुपये दंडाची नोटीस पाठविली. सुमारे ९० लाख रुपये आठ महिन्यांत शिक्षकांच्या वेतनातून कपात केले; परंतु ती रक्कम लेखा विभागाने आयकर विभागाला वळती केली नाही. आयुक्त म्हणाले... ५४३ शिक्षकांच्या वेतनातून टीडीएस कपात झाला. मात्र, आयकर विभागाला जमा न करण्याप्रकरणी मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ३१ मार्चपर्यंत मनपातील सर्व कर्मचार्‍यांचा टीडीएस भरण्यात आलेला आहे. उघडकीस आलेले प्रकरण मागील वर्षाचे आहे. १,६०० कर्मचार्‍यांच्या बाबतीतही माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असे आयुक्त डॉ. कांबळे म्हणाले. टीडीएस देणारे कर्मचारी- १,६०० एकूण वेतन अंदाजे- ६ कोटी रुपये देय वेतन अंदाजे- ३ कोटी रुपये टीडीएस कपात- ३० लाख दरमहा