शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता काँग्रेसजनास चिंतनाची गरज

By admin | Updated: October 29, 2014 00:43 IST

जालना : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात एकही जागा जिंकता आली नाही. दोन मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांनी तुल्यबळ लढत दिली

जालना : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात एकही जागा जिंकता आली नाही. दोन मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांनी तुल्यबळ लढत दिली असली तरी अन्य तीन ठिकाणी उमेदवारांना अनामत रक्कम देखील वाचवता आली नाही. त्यामुळे भवितव्याबाबत पक्षाला आता चिंतनाची गरज निर्माण झाली आहे. खरेतर हा जिल्हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित होता. त्यानंतर १९९५ पासून शिवसेना-भाजपा युतीचा बालेकिल्ला म्हणून जिल्ह्याची ओळख झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही, अशी स्थिती आहे. जिल्हा परिषदेत चार सदस्य आहेत. जालना व परतूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. याशिवाय कुठेही काँग्रेस कार्यकर्त्यांना स्थान नाही. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना केवळ ८ हजार मतांनीच पराभव झाला होता. परंतु एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांना दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मोदी लाटेमुळे देशभरात, राज्यात काँग्रेसला जसा मतांची टक्केवारी कमी होण्याचा फटका बसला, तसा तो जालन्यातही बसला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसने किमान जालन्यात विजय मिळवून भोपळा फोडला होता. विधानसभेपूर्वी जिल्ह्यात काँग्रेसचे जालन्यातून कैलास गोरंट्याल तर सहयोगी म्हणून परतूरमधून सुरेश जेथलिया हे आमदार म्हणून कार्यरत होते. मात्र या निवडणुकीत पक्षाच्या या दोन्ही उमेदवारांना पराभव सहन करावा लागला. परतूरमध्ये पक्षातीलच नाराज मंडळींनी अप्रत्यक्षपणे इतरांना सहकार्य केल्यामुळे या नाराजीचा फटका जेथलिया यांना सहन करावा लागला.भोकरदनमध्ये एल.के. दळवी यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुरेश गवळी यांच्याविरोधात बंडखोरी केली. त्याचा परिणाम काँग्रेसच्या मत विभाजनात झाला. तर घनसावंगीमध्ये तालुकाध्यक्ष विष्णू कंटुले यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना तेथे ऐनवेळी उमेदवारी डॉ. संजय लाखे पाटील यांना जाहीर झाली. बदनापूरमध्ये उमेदवार आयात करावा लागला. तेथे सुभाष मगरे यांना उमेदवारी देण्यात आली. भोकरदन, घनसावंगी आणि बदनापूर या तिन्ही ठिकाणी उमेदवारांना अनामत रक्कम वाचवता आली नाही. (प्रतिनिधी) ४या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू नये, यासाठी आता आटोकाट प्रयत्नांची गरज आहे. तसा सूर आता कार्यकर्त्यांमधूनच उमटू लागला आहे. जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच आगामी काळात वेगवेगळ्या निवडणुकांना कशाप्रकारे सामोरे जायचे, याचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक असल्याचे पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांमधूनच बोलले जात आहे.