शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

२३ गावांतील शौचालय नसलेल्या कुटुंबांना नोटिसा

By admin | Updated: August 5, 2015 00:39 IST

बालाजी बिराजदार ,लोहारा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीपैकी २३ ग्रामपंचायतीकडून गावामध्ये शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना नोटीसा बजावण्यात येत असून, उघड्यावर शौचालयास गेल्यास गुडमॉर्निंग

बालाजी बिराजदार ,लोहारातालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीपैकी २३ ग्रामपंचायतीकडून गावामध्ये शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना नोटीसा बजावण्यात येत असून, उघड्यावर शौचालयास गेल्यास गुडमॉर्निंग पथकाकडून कारवाई झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही, असे नोटिसेत स्पष्ट करण्यात आले आहे. लोहारा तालुक्यात सध्या स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून स्वच्छतेतून समृद्धीचा ध्यास हाच आमचा ग्रामविकास याप्रमाणे तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जि. प. व पं. स. ने केला. ही बाब चांगली असली तरी सध्याची परिस्थिती संकल्पासाठी फारशी अनुकुल नाही. लोहारा तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्रात पाऊस झाला. पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिकेही वाळून जात आहेत. शेतकरी ऊस तोडून जनावरांपुढे टाकत आहेत. त्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. साठवण तलाव, पाझर तलाव उन्हाळ्यातच आटले आहेत. माकणी निम्न तेरणा प्रकल्पातील पाणीही आटल्यात जमा आहे. त्यामुळे तालुक्यातील ४० गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी माणसांबरोबर जनावरांचीही पायपीट होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी, मजूर, व्यापारी यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अशा परिस्थितीमध्ये जगायचे कसे? हाच प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने तालुक्यातील ४५ पैकी २३ ग्रामपंचायतीकडून शौचालय अधिनियम क्रमांक २२ कलम ११५, ११६ व ११७ नुसार सार्वजनिक ठिकाणी रस्त्यात किंवा रस्त्याजवळ उपद्रव, अस्वच्छता करणे, शौचालय बांधकाम न करणे आदी बाबींचा समावेश असलेल्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. तसेच पोलिस अधिनियमानुसार १ हजार २०० रुपये दंड केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उघड्यावर शौचास गेल्यास गुडमॉर्नींग पथकाकडून कारवाई झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ग्रामस्थही चांगलेच पेचात सापडले आहेत. एकीकडे प्रशासनाची नोटिसबाजी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शौचालयाचे बांधकाम करायचे कसे? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीचे अधिकारी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाहीत. कसल्याही परिस्थितीत शौचालयाचे बांधकाम झालेच पाहिजे, असे ठणकावून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी सुरेश शिवदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.