शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस !

By admin | Updated: April 24, 2015 00:37 IST

बाबूराव चव्हाण,उस्मानाबाद ‘७५ टक्के सौरकंदिल, शिलाई मशीन अणदुरात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २३ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी

बाबूराव चव्हाण,उस्मानाबाद‘७५ टक्के सौरकंदिल, शिलाई मशीन अणदुरात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २३ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व वित्त अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नोटिसांच्या खुलाशानंतर सदरील प्रकाराकडे नेमकी कोणी डोळेझाक केली? हे समोर येणार आहे.जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सुमारे बावीस लाख रूपये खर्च करून महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन, पिको-फॉल मशीन आणि सौरकंदिल वाटपाची योजना हाती घेण्यात आली आहे. ही योजना राबविता सर्व प्रकल्पांना समान न्याय मिळणे अपेक्षित होते. म्हणजेच समतोल राखने आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही. तुळजापूर प्रकल्पांतर्गत गावांची संख्या काही कमी नाही. असे असतानाही महिला व बालकल्याण विभागाने अख्ख्या प्रकल्पासाठी मंजूर असलेल्या १०२ उपकरणांपैकी तब्बल ७५ उपकरणे ही एकट्या अणदूर येथील लाभार्थ्यांना मंजूर केली आहेत. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाची एकट्या अणदूरवरच एवढी मेहरबानी का? असा सवाल सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी केला होता. या सर्व प्रक्रियेची चौकशी करण्याबाबतची मागणीही त्यांनी यावेळी केली होती. दरम्यान, योजनेतील असमतोलाचे वृत्त ‘लोकमत’ने २३ मार्च रोजी प्रकाशित केले असता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी या योजनेशी संबंधित असलेले महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व वित्त विभागाचे मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधितांकडून नोटिसांचे उत्तर आल्यानंतरच अशा स्वरूपाचा असमतोल का निर्माण झाला? या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.तुळजापूर प्रकल्पांतर्गतच्या लाभार्थ्यासाठी ३४ शिलाई मशिन, ४१ फिको-फॉल मशिन तर २७ सौरकंदिल मंजूर करण्यात आले होते. याचे लाभार्थी निश्चित करताना समतोल राखणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. ३४ पैकी २३ शिलाई मशीनासाठी एकट्या अणदुरातील लाभार्थी निश्चित केले. तसेच पिको-फॉल मशिनच्या बाबतीतही हेच घडले. ४१ पैकी तब्बल ३० मशीन अणुदरातील लाभार्थ्यांना मंजूर केल्या आहेत. तर २७ पैकी २२ सौरकंदिल अणदूर येथील भार्थ्यांना देण्यात येणार आहेत. या सर्व असमतोलाकडे अधिकाऱ्यांनी का डोळेझाक केली? असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.महिला व बालकल्याण समितीच्या नियमित बैठका होत असतात. या बैठकांना नियुक्त केलेले सदस्य उपस्थित असतात. याच समितीने सदरील २२ लाखाच्या खरेदीला आणि लाभार्थ्यांच्या यादीलाही मंजुरी दिली. असे असे असतानाही एकाही सदस्याच्या निदर्शनास हा प्रकार कसा काय आला नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जावू लागला आहे. हा प्रकार खरोखरच सदस्यांच्या निदर्शनास आला नाही की, त्यांनीही त्याकडे रितसरपणे दुर्लक्ष केले याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.