शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारी अभियंत्यांना नोटीस?

By admin | Updated: August 3, 2014 01:14 IST

जालना : जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मागील सभेत झालेल्या पाणीटंचाई प्रश्नी अनुपालन न दिल्याच्या कारणावरून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे

जालना : जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मागील सभेत झालेल्या पाणीटंचाई प्रश्नी अनुपालन न दिल्याच्या कारणावरून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडून नोटीस बजावण्यात येणार आहे.३१ जुलै रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने न दिलेल्या अनुपालनाच्या मुद्यावरूनच गोंधळाला सुरूवात झाली. माईक तोडणे, टेबल फेकणे, प्रोसेडिंग बुक हिसकावणे यासारखे प्रकार विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केले. तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. या पार्श्वभूमीवर प्रशासन याबाबत काय कारवाई करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. २७ मे रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत विरोधी पक्षनेते सतीश टोपे यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर कार्यकारी अभियंता तांगडे यांनी उत्तरे दिली. परंतु त्याने विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. या चर्चेसंबंधीचे अनुपालन ३१ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या प्रोसेडिंग बुकमध्ये येणे अपेक्षित होते. मात्र ते आले नाही. विरोधी सदस्यांनी याच मुद्यावरून प्रशासनाला धारेवर धरले. तर सत्ताधारी मंडळींनी प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यानुसार पाणीटंचाई प्रश्नी अनुपालन का दिले नाही, याचा जाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून विचारण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी कार्यकारी अभियंता तांगडे यांना प्रशासकीय पातळीवर समज देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.३१ जुलै रोजी सभेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर येत्या १४ आॅगस्टपूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा होणार आहे. या सभेला अवकाश असला तरी ग्रामीण भागातील जनतेचे आतापासूनच त्याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासातही हा प्रकार अपवादात्मक घडला आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राजकीय पटलावरही या बाबीचे महत्व वाढले आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन.तांगडे हे गेल्या एक-दीड महिन्यांपूर्वीच रूजू झाले आहेत. यापूर्वी तीन वर्षांपूर्वीही त्यांनी याच पदावर जालना येथे काम केले होते.