शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजची रॉकेल, धान्यटंचाई पुरवठा विभागाच्या गावीही नाही

By admin | Updated: July 1, 2014 01:07 IST

वाळूज महानगर : वाळूजच्या रॉकेल व धान्य टंचाईकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे लाभार्थींची गैरसोय होत आहे.

वाळूज महानगर : वाळूजच्या रॉकेल व धान्य टंचाईकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे लाभार्थींची गैरसोय होत आहे.अनेक शिधापत्रिकाधारकांनी रॉकेल व धान्य नियमितपणे मिळत नसल्याची तक्रार ग्रामपंचायतकडे केली आहे. गावात एकूण ७ स्वस्त धान्य दुकाने असून, १४ किरकोळ रॉकेल विक्रेते आहेत. ७ पैकी ५ दुकाने जुन्या गावात असून साठेनगर व कमळापूर रोडला प्रत्येकी एक दुकान आहे. जुन्या गावाची लोकसंख्या मर्यादित असूनही तेथे जास्त स्वस्त धान्य दुकाने आहेत. नवीन वसाहतीतील कार्डधारकांना धान्य व रॉकेलसाठी दूरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. कामगारांना रजा घेऊन स्वस्त धान्य दुकानासमोर सकाळपासूनच रांगेत थांबावे लागते. अनेक शिधापत्रिकाधारकांना विक्रेते कोटा कमी आला यासह वेगवेगळी कारणे सांगून रॉकेल देण्यास टाळाटाळ करतात. रेशन दुकानावरील धान्य व रॉकेलचे वितरण व्यवस्थित व्हावे, यासाठी गावपातळीवर दक्षता समितीही स्थापन करण्यात आली आहे. मात्र, दक्षता समितीचे पदाधिकारी या तक्रारींबद्दल काहीच बोलत नाहीत. इंधनासाठी जवळपास लाकडेही मिळत नाहीत. ३० जूनपासून रमजानचा महिना सुरू झाला असून, रॉकेल मिळत नसल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. ग्रामपंचायतीमध्ये ठराव गावात शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य व रॉकेल मिळत नसल्याच्या तक्रारी लाभार्थींनी ग्रामपंचायतीकडे केल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानदार तसेच रॉकेल विक्रेते जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत मनमानी करतात. स्वस्त धान्य व रॉकेल विक्रीच्या वेळा दुकानदार पाळत नाहीत. त्यांच्या सोयीप्रमाणे केव्हाही दुकाने उघडतात व बंद करतात. लोकसंख्येच्या तुलनेत रॉकेलचा पुरवठा कमी होत आहे. रमजान महिन्यासाठी रॉकेल व धान्याचा कोटा वाढविण्यात यावा, असा ठराव ग्रामपंचायतीने तहसीलला पाठविला आहे, अशी माहिती सरपंच रंजना भोंड, उपसरपंच खालेद पठाण यांनी दिली.