विशेष सभेत मुख्याधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2015 00:50 IST2015-06-16T00:28:35+5:302015-06-16T00:50:42+5:30

माजलगाव : येथील पालिका बरखास्त करण्याची शिफारस करणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी बी. सी. गावित यांना अखेर महागात पडले

Non-believance Resolution on the Chiefs in Special Assembly | विशेष सभेत मुख्याधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव

विशेष सभेत मुख्याधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव

विशेष सभेत मुख्याधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव
माजलगाव : येथील पालिका बरखास्त करण्याची शिफारस करणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी बी. सी. गावित यांना अखेर महागात पडले. नगर परिषदेची व नगरसेवकांची बदनामी केली, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करत सोमवारी विशेष सभेत सर्वानुमते अविश्वास ठराव पारित करण्यात आला.
नगर परिषदेची माहिती आॅनलाईन भरणा न केल्याचा ठपका ठेवत नगर प्रशासन संचालनालयाचे प्रधान सचिवांनी मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. या नोटिसीला उत्तर देताना त्यांनी नगर परिषदेतील गैरकारभाराबाबत तक्रार करून चार पानी पत्र प्रधान सचिवांना पाठविले होते.
सोमवारी नगरसेवक डॉ. अशोक तिडके यांनी मुख्याधिकारी गावित यांना खुलासा मागितला. परंतु एकाही मुद्द्यावर मुख्याधिकारी गावित यंनी उत्तर दिले नाही.
यामुळे मुख्याधिकारी गावित यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केल्याची माहिती सभेनंतर नगराध्यक्ष, पंचशीला जावळे, उपाध्यक्ष दीपक मेंडके, नगरसेवक सहाल चाऊस, डॉ. अशोक तिडके, अमोल सोळंके, मच्छिंद्र काळे यांनी पत्रकारांना दिली. (वार्ताहर)

Web Title: Non-believance Resolution on the Chiefs in Special Assembly