शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून सानुग्रह अनुदानाचा नाही पत्ता !

By admin | Updated: August 12, 2015 00:58 IST

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अथवा अपंगत्व आल्यास शासनाकडून संबंधितांच्या कुटुंबियास सानुग्रह अनुदान दिले जाते.

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अथवा अपंगत्व आल्यास शासनाकडून संबंधितांच्या कुटुंबियास सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र मागील वर्षभरापासून मागणीच्या प्रमाणात अनुदान उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे जवळपास ४८ प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यातच दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत आणखीन १३ प्रस्ताव मंजूर झाल्याने प्रस्तावांची संख्या आता ६१ वर जावून ठेपली आहे. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये दिले जातात. कायमचे अपंगत्व आल्यास ५० हजार तर एक अवयव निकामी झाल्यास ३० हजार रुपये देण्यात येतात. या योजनेला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. योजनेसाठी येणाऱ्या प्रस्तावांची जिल्हास्तरीय कमिटीकडून छाननी झाल्यानंतर ते अनुदानासाठी पात्र ठरतात. फेब्रुवारी २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत झालेल्या बैठका दरम्यान जवळपास ५२ प्रस्ताव दाखल झाले होते. यापैकी अवघ्या चार जणांनाच अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तुटपुंजा स्वरुपात अनुदान प्राप्त होत असल्याने इतर लाभार्थ्यांना या रक्कमा एकेक वर्ष झाले तरी मिळत नसल्याचे समोर आले आहे. आजही ४८ प्रस्ताव प्रलंबित आहेत. यातील ८ ते १० प्रस्ताव हे मार्च २०१४ मध्ये मंजूर झालेले आहेत. एकेक वर्ष लोटले तरी अनुदान मिळत नसल्याने लाभार्थ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.दरम्यान, मागील एक वर्षापासून मागणीच्या प्रमाणात अनुदान मिळत नसल्याने ४८ प्रस्ताव प्रलंबित आहेत. असे असतानाच दोन-तीन दिवसापूर्वी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत आणखी १३ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता मंजूर प्रस्तावांची संख्या ६१ वर जावून ठेपली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाकडे वेळोवेळी अनुदानाच्या रक्कमेची मागणी नोंदविली जात आहे. परंतु शासनाकडूनही केवळ आश्वासन मिळत आहे. त्याची पूर्तता होत नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सातत्याने अनुदानाची मागणी केली जात आहे. परंतु शासनाकडून मागणीच्या प्रमाणात अनुदानाची रक्कम उपलब्ध होत नाही. ३१ मार्च पूर्वी ३ लाख रुपये मिळाले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात ७५ हजार आणि मे महिन्यात ७५ हजार असे एकूण अवघे साडेचार लाख रुपये मिळाले आहेत. या माध्यमातून अवघ्या ६ लाभार्थ्यांना लाभ देता आला. शासनाने आखडता हात घेतल्याने ४८ लाभार्थ्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे.