मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी ढगच नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 04:53 AM2019-08-13T04:53:31+5:302019-08-13T04:54:27+5:30

मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली असली तरी पुरेसे ढगच नसल्याने प्रयोगाला विश्रांती घ्यावी लागली आहे. सोमवारी चौथ्या दिवशी विमानांचे उड्डाण झाले नाही. ​​​​​​​

No clouds for artificial rain in Marathwada! | मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी ढगच नाहीत!

मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी ढगच नाहीत!

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली असली तरी पुरेसे ढगच नसल्याने प्रयोगाला विश्रांती घ्यावी लागली आहे. सोमवारी चौथ्या दिवशी विमानांचे उड्डाण झाले नाही.

शुक्रवारपासून या प्रयोगाला सुरवात झाली. दुसऱ्या दिवशी पुरेसे ढग नसल्याने विमानाचे उड्डाणच झाले नाही. रविवारी पैठण, जालना, औरंगाबाद तालुक्यांतील काही भागांवर दोन विमान फिरले. एरोसोल्सने फवारणी केली. परंतु त्याचा परिणाम झाला नाही. सोमवारी अनुकूल ढग नसल्याने विश्रांती घेण्यात आली. मंगळवारी पुन्हा बैठक होऊन प्रयोगाचा निर्णय होईल, असे विभागीय महसूल उपायुक्त सतीश खडसे यांनी सांगितले.

मराठवाड्यात पुरेसा पाऊस झाला नसला नाशिकच्या पावसाने गोदावरीला आलेल्या महापुरामुळे जायकवाडी ८८.५३% भरले आहे. त्यामुळे नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. सध्या आवक अत्यल्प असून धरणातून पाणी सोडण्याची शक्यता नसल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.
 

Web Title: No clouds for artificial rain in Marathwada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.